उद्याचे हवामान: नाशिक मध्ये 24 जुलै दिवशी विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाची शक्यता; IMD चा अंदाज

सध्या नाशिक मध्ये घाट परिसरातील तुरळक ठिकाणी पुढील काही तास 50-60 किमी/तास वेगाने वाहणाऱ्या सोसाट्याच्या वाऱ्यासह तीव्र ते अतितीव्र पावसाची शक्यता आहे, तसेच काही भागांत विजांच्या कडकडाटासह वादळाचीही शक्यता आहे.

Nashik Rains

Nashik Weather Prediction: नाशिक मध्ये सध्या पावसाचा जोर वाढला आहे.  24 जुलै दिवशी देखील नाशिक शहराला पाऊस झोडपण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. आयएमडीच्या अंंदाजानुसार, 24 जुलै दिवशी दुपारनंतर किंवा संध्याकाळी जोरदार ते मुसळधार पावसाची शक्यता आहे. सोबतच विजांच्या कडकडाटासह व सोसाट्याच्या वाऱ्यासह (30-40 किमी/तास) पाऊस बरसण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.  24 जुलै दिवशी नाशिक (Nashik) मध्ये कमाल तापमान 29 अंश तर किमान तापमान 23 अंश असण्याचा अंदाज आयएमडीने वर्तवला आहे. दरम्यान 25 जुलै पासून पुढे पावसाबाबत विशेष अलर्ट देण्यात आलेला नाही. नक्की वाचा: उद्याचे हवामान महाराष्ट्र: 24 जुलै रोजी मुंबई, नाशिक, पुण्यासह राज्यातील प्रमुख जिल्ह्यांमध्ये मुसळधार मौसमी पाऊस .

नाशिक मधील हवामान अंदाज

गोदावरी नदीने ओलांडली धोक्याची पातळी

नाशिक मध्ये झालेल्या जोरदार पावसामुळे सध्या गोदावरी नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. नागरिकांनी सतर्क राहण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.  गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आल्याची देखील माहिती देण्यात आली आहे.  आज सकाळीच रेट अलर्ट जारी करत प्रशासनाने नाशिक जिल्ह्याच्या घाट परिसरातील तुरळक ठिकाणी 60-70 किमी/तास वेगाने वाहणाऱ्या सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. असा अंदाज वर्तवला होता.

सध्या नाशिक मध्ये घाट परिसरातील तुरळक ठिकाणी पुढील काही तास  50-60 किमी/तास वेगाने वाहणाऱ्या सोसाट्याच्या वाऱ्यासह तीव्र ते अतितीव्र पावसाची शक्यता आहे, तसेच काही भागांत विजांच्या कडकडाटासह वादळाचीही शक्यता आहे. अशी माहिती देण्यात आली आहे.

 

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement