हॉलिडे एक्सप्रेसचे चाक नांदगाव स्थानकावर तुटल्याने मुंबईच्या दिशेने येणारी वाहतूक ठप्प

त्यामुळे मुंबईकडे येणारी वाहतूक ठप्प झाल्याचे सांगण्यात येत आहे.

Representational Image | Indian Railways (Photo Credits: ANI)

बरेली (Bareilly) स्थानकावरुन मुंबईच्या (Mumbai) दिशेने निघालेल्या हॉलिडे एक्सप्रेसचे (Holiday Express) चाक नांदगाव स्थानकावर तुटले आहे. त्यामुळे मुंबईकडे येणारी वाहतूक ठप्प झाल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र मोठा अपघात टळला असून कोणतेही प्रवाशांचे कोणतेही नुकसान झालेले नाही.

नांदगाव स्थानकावर हॉलिडे एक्सप्रेसचे दोन डबे रुळावरुन अचानक घसरले. त्यावेळी तातडीने याची पाहणी केली असता रेल्वेच्या चाकाला तडे गेल्याचे दिसून आल्याने रुळांवरुन डबे घसरल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र मुंबईकडे येणारी वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. तर चाक तुटलेला डबा वेगळा करण्यात आला असून त्याचे काम सुरु करण्यात आले आहे.(नालासोपारा येथील जाधव मार्केट मध्ये भीषण आग, 25 दुकानांचे मोठे नुकसान)

परंतु वाहतूक पूर्ववत कधी होईल हे अद्याप कळू शकले नाही. तरी वाहतूक पुन्हा सुरळीत सुरु होण्यासाठी संध्याकाळ होऊ शकते असा अंदाज वर्तवला जात आहे.