नाशिक शहरामध्ये 15,16 फेब्रुवारी दिवशी वाहतुकीच्या मार्गात बदल; राज्यस्तरीय वकील परिषद, उद्धव ठाकरे, छगन भुजबळ यांच्या कार्यक्रमामुळे बंद राहणार 'हे' मार्ग

दरम्यान वकील परिषदेच्या कार्यक्रमादिवशी शहर वाहतूक शाखेकडून सीबीएस ते मेहेर चौकापर्यंत दोन्ही बाजूकडील वाहतूक या विकेंडला बंद राहणार आहे.

प्रतिकात्मक फोटो (Photo Credits-Facebook)

नाशिक मध्ये येत्या विकेंडला महाराष्ट्र आणि गोवा बार काऊंसिल तसेच नाशिक बार असोसिएशन कडून नाशिक जिल्हा न्यायालयाच्या आवारामध्ये राज्यस्तरीय वकील परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. सोबतच रविवारी (16 फेब्रुवारी) दिवशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शरद पवार, छगन भुजबळ आदी नेते येणार असल्याने नाशिक शहरामध्ये शनिवार (15 फेब्रुवारी) आणि रविवारी (16 फेब्रुवारी) दिवशी वाहतूकीच्या काही मार्गांमध्ये बदल करण्यात आले आहेत. दरम्यान वकील परिषदेच्या कार्यक्रमादिवशी शहर वाहतूक शाखेकडून सीबीएस ते मेहेर चौकापर्यंत दोन्ही बाजूकडील वाहतूक या विकेंडला बंद राहणार आहे.

नाशिकमध्ये शनिवार, 15 फेब्रुवारी दिवशी सीबीएस ते मेहेर चौक दरम्यान दुपारी 2 ते रात्री 10 वाजेपर्यंत बंद राहणार आहे. तर रविवार, 16 फेब्रुवारी दिवशी सकाळी 9 ते संध्याकाळी 7 वाजेपर्यंत दोन्ही बाजूकडील वाहतूक बंद राहणार आहे. या वाहतूक बदलाबद्दल पोलिस उपायुक्तांकडून माहिती देण्यात आली आहे. तसेच वाहन बंदीचे उल्लंघन करणार्‍यांवर कारवाई करण्याचेही आदेश देण्यात आले आहेत. मात्र ही वाहतूक बंदी पोलीस वाहने, रुग्णवाहिका, शववाहिका, अग्निशमन दलाची वाहने व इतर शासकीय वाहनांना लागू राहणार नाही.

नाशिक शहरातील 15,16 फेब्रुवारी दिवशी कोणते आहेत पर्यायी मार्ग

सीबीएस चौकाकडून डाव्या बाजूकडे वळून टिळकवाडी सिग्नल मार्गे पुढे जाण्याचा मार्ग खुला असेल. मेहेर चौकातून डाव्या बाजूकडे वळून एमजी रोडमार्गे सांगली बँक सिग्नलमार्गे पुढे जाण्याची मुभा देण्यात आली आहे.

शनिवारी नशिकमध्ये होणार्‍या कार्यक्रमामध्ये सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश शरद बोबडे यांच्या हस्ते वकील परिषदेचे व जिल्हा न्यायालयाच्या इमारतीच्या कामाचे उदघाटन केले जाणार आहे.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif