Nashik Police: बॅरिकेट अंगावर पडून पोलीस निरीक्षकाचा मृत्यू, नाशिक येथील घटना

हा पोलीस निरीक्षक मुळचा हिंगोली येथील रहिवासी असून नाशिक (Nashik Police) येथे कर्तव्यावर होते. गजानन सैंदाने असे त्यांचे नाव आहे. कर्तव्य बजावत असतानाच त्यांच्यासोबत ही दुर्दैवी घटना (Accident) घडली.

Barricade | Representational & Edited Image (Photo Credits: Pixabay)

दुचाकी धडकल्यानंर बॅरीकेट (Barricade) अंगावर पडून पोलीस निरीक्षकाचा (Police Inspector) मृत्यू झाला आहे. हा पोलीस निरीक्षक मुळचा हिंगोली येथील रहिवासी असून नाशिक (Nashik Police) येथे कर्तव्यावर होते. गजानन सैंदाने असे त्यांचे नाव आहे. कर्तव्य बजावत असतानाच त्यांच्यासोबत ही दुर्दैवी घटना (Accident) घडली. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, मृत्यूशी सुरु असलेली त्यांची झुंज अपयशी ठरली. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्यावर हिंगोली जिल्ह्यातील मूळ गावी अंत्यसंस्कार करण्यात आले. मनमिळवू असलेला एक अधिकारी आणि जबाबादार नागरीक गमावल्याने त्यांच्या सहकाऱ्यांसह गावकऱ्यांमधून हळहळ व्यक्त होत आहे.

गजानन सैंदाने हे नाशिक शहरातील एका चौकात कर्तव्य बजावत होते. या वेळी ते बॅरीकेटजवळ उभे असताना नेमकी त्याच वेळी एक दुचाकी भरधाव वेगात बॅरीकेटला धडकली आणि बॅरीकेट गजानन सैंदाने यांच्या अंगावर पडले. या अपघातात ते गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचार सुरु असताना त्यांचा मृत्यू झाला. (हेही वाचा, Aurangabad Accident: नागपूर-मुंबई महामार्गावर असलेल्या दुकानात भरधाव कार घुसल्याने दुकानदाराचा मृत्यू, 5 जण जखमी)

महाराष्ट्र आणि देशभरात रस्त्यांचे जाळे मोठ्या प्रमाणावर विणले जात आहे. असे असताना नागरिकांच्या दळनवळणाचा प्रश्न बऱ्यापैकी निकाली निघाला आहे. असे असेल तरी त्यासोबत अपघातांचेही प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. त्यामुळे रस्तेसुक्षा हा सद्याचा परवलीचा शब्द झाला आहे. इतका की घरातून बाहेर पडलेला मनुष्य पुन्हा सुखरुप घरी येईपर्यंत त्याची कोणतीच खात्री देता येत नाही. अनेकदा तर रस्त्यावर रहदारीचे नियम पाळूनही समोरच्या व्यक्तीकडून झालेल्या चुकांमुळे अपघात घडत असल्याचे पाहायला मिळते. ज्यामुळे लोकांचा कारणाशिवाय बळी जाताना आढळून येते. रस्ते व बांधकाम मंत्रालयाने तातडीने या अपघातांची नोंद घेऊन कार्यवाही करावी अशी मागणी नागरिक सातत्याने करतात.