नाशिक: पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी घडवली 15 वर्ष दुरावलेल्या माय-लेकरांची भेट, सोशल मीडियात व्हिडिओ व्हायरल (Watch Video)
पोलिस स्थानकात 14 वर्षांनी भेटलेल्या माय - लेकरांनी एकमेकंना पेढा भरवत एकत्र राहण्याचे वचन विश्वास नांगरे पाटील यांना दिले.
विश्वास नांगरे पाटील (Vishwas Nangare Patil) हे नाव अनेक गोष्टींमुळे चर्चेमध्ये असतं. अनेक तरूणांचे आदर्श असणारे नाशिकचे पोलिस आयुक्त (Nashik Police Commissioner) यांनी माय-लेकांची तब्बल 14 वर्षांनंतर भेट घडवून आणल्याने सोशल मीडियामध्ये सध्या एक व्हीडिओ व्हायरल होत आहे. आजकाल वृद्ध पालकांची जबाबदारी घेणं हे तरुणांना ओझ वाटतं. अशाच एका वृद्ध महिलेची हकिकत पाहून विश्वास नांगरे पाटील यांनी त्यांच्या मुलांचा शोध घेऊन माय-लेकरांची भेट घडवली.
प्रमिला नाना पवार या 61 वर्षीय महिलेचा एक मुलगा सतीश वस्तू व सेवा कर विभागात काम करतो तर आतीश परिवहन महामंडळामध्ये कंडक्टर आहे. हे दोघेही कामानिमित्त बाहेर आहेत. त्यांच्या पश्चात प्रमिलांच्या सुनादेखील लक्ष देत नसल्याने प्रमिलांवर रस्स्त्यावर राहण्याची वेळ आली. प्रमिलांचा एक व्हायरल व्हिडिओ पाहून विश्वास नांगरे पाटील यांनी त्यांच्या मुलाचा शोध घेण्याचे आदेश दिले. वस्तू व सेवा कर विभागात निरीक्षक म्हणून काम करणार्या मुलाशी संपर्क झाल्यानंतर त्यांनी पत्नीसह त्यांच्या कार्यालयात बोलावून घेतलं. मुलाशी बोलल्यानंतर त्यांचे समुपदेशन केलं आणि आईचा सांभाळ करण्याचा सल्ला दिला.
पोलिस स्थानकात 14 वर्षांनी भेटलेल्या माय - लेकरांनी एकमेकंना पेढा भरवत एकत्र राहण्याचे वचन विश्वास नांगरे पाटील यांना दिले.