Nashik News: टोळक्यांचा दोन तरुणांवर जीवघेणा हल्ला,दोघांचा मृत्यू; घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण
नाशिक जिल्ह्यात दोन तरुणांवर दहा बारा लोकांनी प्राणघात हल्ला केला.या हल्ल्यात त्यांचा मृत्यू झाला आहे.
Nashik News: नाशिक (Nashik) जिल्ह्यात दहा ते बारा जणांनी धारदार शस्त्राने दोन तरुणांवर जीवघेणा हल्ला केला. या घटनेमुळे नाशिक जिल्हा हादरला आहे. अंबड लिंक रोडवर ही घटना घडली आहे. या प्राणघात हल्ल्यात दोन तरुणांचा मृत्यू झाला आहे. आधीच्या भांडणातून हा हल्ला केल्याचा संशय आहे. मेराज खान (18) या हल्ल्यात त्याचा मृत्यू झाला आहे. तर, तर इब्राईम शेख या तरुणावर नाशिक जिल्हा रुग्णालयातील आयसीयूमध्ये उपचार सुरू होते. मात्र उपचारादरम्यान त्याचा देखील आरोप झाला. पोलीसांनी आरोपीचा शोध सुरु केला आहे.
नाशिक जिल्ह्याच्या अंबड लिंक रोडवर गुरुवारी रात्री 8 च्या सुमारास संजीवनगर परिसरातील शिवनेरी चौकात दहा ते बारा जणांच्या टोळक्याने दोन तरुणांवर धारदार शस्त्राने जीवघेणा हल्ल्या केला. मेराज खान या 18 वर्षीय युवकाचा मृत्यू झाला. तर इब्राईम शेखवर जिल्हा रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. आधीच्या भांडणात हा हल्ला झाल्याचा पोलिसांना प्राथमिक संशय आला आहे.
या घटनेनंतर नातेवाईंकांनी पोलीसांचा निषेध आणि जिल्हा रुग्णालयात उपचारात हलगर्जीपणा होत असल्याचा आरोप केला आहे. अंबड तालुक्यात या घटनेमुळे गुरुवारच्या उशीरा रात्री पर्यंत तणावाचे वातावरण पसरले होते. पोलीसांनी या घटनेसंदर्भात चोख बंदोबस्त करण्यात आला आहे. पोलीस या घटनेचा तपास सुरु केला आहे. या घटनेमुळे परिसर हादरलं आहे. पोलीसांनी आरोपीचा शोध सुरु केला आहे.
(The above story first appeared on LatestLY on Aug 11, 2023 09:40 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

