Nashik Municipal Corporation Election 2022: नाशिक महापालिका निवडणुकीसाठी सर्वपक्षीयांची जोरदार तयारी

दुसऱ्या बाजूला या निवडणुका योग्य पद्धतीने पार पडाव्या यासाठी प्रशासन तयालीला लागले आहे. या निवडणुकांबाबत येत्या मे महिन्यामध्ये प्रशासन तयारी करणार आहे. त्यासाठी एक बैठक आयोजित केली जाणार असून या बैठकीत या आधिच्या निवडणुकांचा आढावा घेतली जाण्याची शक्यता आहे.

Nashik Municipal Corporation | (File Photo)

नाशिक महापालिका निवडणूक 2022 (Nashik Municipal Election 2022) डोळ्यासमोर ठेऊन सर्वच राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणी करण्यास सुरुवात केली आहे. दुसऱ्या बाजूला या निवडणुका योग्य पद्धतीने पार पडाव्या यासाठी प्रशासन तयालीला लागले आहे. या निवडणुकांबाबत येत्या मे महिन्यामध्ये प्रशासन तयारी करणार आहे. त्यासाठी एक बैठक आयोजित केली जाणार असून या बैठकीत या आधिच्या निवडणुकांचा आढावा घेतली जाण्याची शक्यता आहे. या आढव्यानंतरच प्रशासन ठोस निर्णयाप्रत पोहोचेल, असे सांगितले जात आहे.

दरम्यान, नाशिक महापालिकेसाठी आतापर्यंत एकूण सहा पंचवार्षिक निवडणुका झाल्या आहेत. पुढच्यावर्षी म्हणजेच जानेवारी 2022 मध्ये पार पडणारी महापालिका निवडणूक ही सातवी पंचवार्षिक असणार आहे. नाशिक महापालिकेसाठी सर्वप्रथम 1992 मध्ये निवडणुक पार पडली होती. त्या वेळी महापालिका अगदीच नवी होती. त्यामुळे लोकसंख्या प्रभाग आदींची संख्या पाहता नियोजन अगदीच मर्यादित होते. नंतरच्या काळात महापालिकेचा पसारा चांगलाच वाढला. त्यामुळे हद्द, लोकसंख्या, वॉर्ड अशा विविध गोष्टींची त्यात भर पडत गेली. त्यामुंळे सर्वच राजकीय पक्षांना निवडणुकांची गणीते बांधताना मोठी कसरत करावी लागत आहे.

नाशिक महापालिका पंचवार्षिक निवडणूक इतिहासावर नजर टाकता महापालिकेवर सर्वपक्षीय सत्ता पाहायला मिळते. 1992 मध्ये महापालिकेवर काँग्रेस पक्षाची सत्ता आली. 1997 मध्ये अपक्षांच्या मदतीने शिवसेनेने या महापालिकेवर सत्ता मिळवली. त्यानंर 2002 मध्ये झालेल्या निवडणुकीत शिवसेना-भाजप या पक्षांनी युती करुन निवडणूक लढवली. या महापालिकेवर युतीची सत्ता आली. त्यानंतर विविध पक्षांची महापालिकेवर सत्ता पाहायला मिळाली. (हेही वाचा, Sangli Mayor Election: सांगीलीचा महापौर, उपमहापौर कुणाचा? राष्ट्रवादी काँग्रेस की भाजप? सस्पेन्स कायम, आज निवडणूक)

नाशिक महापालिकेवर 2012 मध्ये राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पक्षाने बहुमताने सत्ता मिळवली. त्यानंतर 2017 मध्ये भारतीय जनता पक्षाची या महापालिकेवर सत्ता आली. आता 2022 मध्ये महापालिकेवर कोणाचा झेंडा फडकतो याबाबत मोठी उत्सुकता आहे.