नाशिक: सिनेमामुळे विवाहित दांपत्याचे भांडण विकोपाला, पोटगीसाठी बायकोला दिली 10 हजारांची चिल्लर
त्यानंतर हे प्रकरण कोर्टात गेले असता सदर महिलेला दोन हजार रुपयांची पोटगी नवऱ्याने द्यावी असे आदेश देण्यात आले.
सध्या विवाहित दांपत्यामध्ये कोणत्या गोष्टीवरुन भांडण होईल याचा नेम नाही. तसेच या भांडणाचा शेवट काय असेल याचा सुद्धा विचार करु शकत नाहीत. मात्र नाशिक (Nashik) येथे सिनेमामुळे विवाहित दांपत्याचे भांडण विकोपाला जात घटस्फोटापर्यंत गेले. त्यानंतर हे प्रकरण कोर्टात गेले असता सदर महिलेला दोन हजार रुपयांची पोटगी नवऱ्याने द्यावी असे आदेश देण्यात आले.
गेल्या दीड वर्षांपासून नवरा बायोकाच्या या भांडणावर कोर्टात सुनावणी सुरु असून पोटगीची रक्कम 42 हजार रुपयापर्यंत झाली. यामधील पहिला हफ्ता 10 हजार रुपयांचा बायकोला देण्यात आला. तर सोमवारी दुसरा हफ्ता देण्यासाठी 10 हजार रुपयांची चिल्लर नवरा कोर्टात घेऊन आला. मात्र एवढी 10 हजार रुपयांची चिल्लर कोण मोजणार असा प्रश्न उपस्थित झाला. परंतु कोर्टाने नवऱ्यालाच आणलेली 10 हजार रुपयांची चिल्लर मोजण्यास सांगितली. याबद्दल महाराष्ट्र टाइम्सने वृत्त दिले आहे.(मुंबई: अल्पवयीन मुलीचा पतीकडून लैंगिक छळ, भावाकडून बलात्कार तर आईनेच ढकलले वेश्याव्यवसायात; 5 जणांना अटक)
या प्रकारावरुन नवऱ्याने आपले मत मांडले असून महिलांनी खोट्या पद्धतीने आरोप लगावून नवऱ्यांना कोर्टात खेचू नये. तसेच पत्नीला फक्त सिनेमा दाखवला नाही हेच कारण आमच्या घटस्फोटाच्या वादाचे ठरले असून काही खोटे आरोप लावण्यात आल्याचे नवऱ्याने सांगितले. घडलेल्या या प्रकारामुळे नवऱ्यासह अन्य जणांनासुद्धा याचा त्रास होत असल्याचे त्याने म्हटले आहे.