नाशिक: पंढरपूर कडे निघालेल्या सायकलवारी 2019 ला गालबोट; 10 वर्षाच्या चिमुरड्याचा ट्रक खाली चिरडून मृत्यू
नाशिकहून सिन्नर कडे जाणार्या सायाकलवारीला गालाबोट लागलं आहे. यामध्ये एका चिमुकल्याचा मृत्यू झाला आहे. सायकल वार्याच्या वेगाने एका बाजूला कलंडली आणि त्यानंतर मागून येणार्या भरधाव ट्रकने त्याला उडवले.
नाशिककडून (Nashik) पंढरीला निघालेल्या विठू माऊलींच्या वारकर्यांच्या सायकलवारीमध्ये आज अपघात झाला आहे. सिन्नर बायपास रोड (Sinner Bypass Road) जवळ ट्रकखाली एका चिमुरड्याचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. 10 वर्षाच्या प्रेम निफाडे (Prem Niphade) या मुलाचा ट्रकच्या धडकेत अपघाती मृत्यू झाला.
सायकलवारीमध्ये यंदा पहिल्यांदा लहान मुलांनी सहभाग घेतला होता. या वारीत सहभागी प्रेमच्या मागून आयरश ट्रकने त्याला धडक दिली. या धडकेत प्रेम गंभीर जखमी झाला. त्याला नजीकच्या ग्रामीण रूग्णालयात दाखल करण्यात आले मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. चहापानासाठी वारी थांबली होती. अशावेळेस वार्याचा वेग आला आणि त्याचा सायकलवरून तोल जाऊन खाली पडला. मात्र मागून भरधाव वेगात आलेल्या ट्रकखाली येऊन त्याचा मृत्यू झाला. Pandharpur Wari 2019:चंद्रभागा नदीच्या तीरावर महिला भाविकांसाठी 20 फिरती चेजिंग रूम्स
ट्रक सिन्नर कडून पुण्याच्या दिशेने जात होता. पूर्वी गावातून जाणरी ही सायकल वारी मागील काही वर्षांपासून हाय वे वरून जाण्यास सुरूवात झाली आहे. यादरम्यान हा अपघात झाला आहे. यंदा या सायकलवारीचं आठवं वर्ष असून सुमारे 800 सायकलिस्ट यामध्ये सहभागी झाले आहेत.
(The above story first appeared on LatestLY on Jun 28, 2019 11:25 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

