Nashik Crime: समुद्धी महामार्गावरुन गांजाची तस्करी, 42 लाखांचा मुद्देमाल जप्त

समृद्धी महामार्गच्या सुरक्षेची जबाबदारी असलेल्या महाराष्ट्र सुरक्षा फोर्सच्या गस्ती पथकाने महामार्गावर थांबलेल्या दोन वाहनांमधून तस्करी होणारा 42.96 लाखांचा सुमारे 214.800 किलो गांजा पकडला.

Crime | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

समृद्धी महामार्गच्या सुरक्षेची जबाबदारी असलेल्या महाराष्ट्र सुरक्षा फोर्सच्या गस्ती पथकाने महामार्गावर थांबलेल्या दोन वाहनांमधून तस्करी होणारा 42.96 लाखांचा सुमारे 214.800 किलो गांजा पकडला. सुरक्षारक्षकांना पाहून दोन्ही वाहनांसोबत असलेल्या इसम अंधाराचा फायदा घेत पळून जाण्यात यशश्वी झाले झाले धूम ठोकली. राष्ट्रीय महामार्ग सुरक्षा पथकाचे पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय चव्हाणके, महाराष्ट्र सुरक्षा फोर्सचे सुरक्षा रक्षक आकाश सानप, ज्ञानेश्वर हेंबाडे संयुक्तपणे समृद्धी महामार्गावर गस्त घालण्यासाठी गोंदे टोल प्लाझा येथून शिर्डीच्या दिशेने निघाले होते. खंबाळे शिवारात चॅनल क्रमांक 557 या ठिकाणी अशोक लेलैंड कंपनीचा ट्रक व सुझुकी कॅरी टेम्पो महामार्गावर मुंबईच्या दिशेला जाणाऱ्या लेनवर उभा होता. (हेही वाचा - Salman Khan Residence Firing Case: गॅलेक्सी अपार्टमेंट बाहेर झालेल्या गोळीबार प्रकरणात 5वा आरोपी राजस्थान मधून अटकेत!)

या ठिकाणी काही गोण्या क्रॉसिंग करण्यात येत असल्याचे पथकाचे निदर्शनास आले. पोलिसांनी थांबून विचारपूस केली असता दोन्ही वाहनांसोबत असणारे इसम अंधाराचा फायदा घेत समृद्धीची सुरक्षा भिंत ओलांडून पसार झाले. या वाहनांची तपासणी केली असता त्यात गोण्यांमध्ये गांजा असल्याचे आढळून आले.

महाराष्ट्र सुरक्षा फोर्सचे प्रभारी मिलिंद सरवडे यांनी याबाबत वावीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदेश पवार यांना कळवले. पवार यांच्यासह उपनिरीक्षक बाळासाहेब आहेर, पारस वाघमोडे, हवालदार हेमंत कदम, सचिन काकड, गोविंद सूर्यवाड, साहेबराव बलसाने, सचिन कहाने यांनी धाव घेत दोन्ही वाहने ताब्यात घेतली. दोन्ही वाहनांमधून हस्तगत केलेल्या गोण्यांमध्ये असलेल्या गांजाचे वजन 2 किंटल 15 किलो भरले. त्याची बाजारातील किंमत सुमारे 42.96 लाख रुपये इतकी आहे.

 



संबंधित बातम्या