नाशिक मध्ये आढळले Delta Variant चे 30 रुग्ण
नाशिक मध्ये 30 जणांना डेल्टा वेरिएंटची लागण झाल्याची बातमी समोर येत आहे.
राज्यात कोरोना व्हायरसची दुसरी लाट (Coronavirus Second Wave) ओसरत असतानाच डेल्टा पॉझिटीव्ह (Delta Positive) रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. नाशिक मध्ये 30 जणांना डेल्टा वेरिएंटची लागण झाल्याची बातमी समोर येत आहे. या 30 पैकी 28 रुग्ण हे ग्रामीण भागातील आहेत. दरम्यान, या रुग्णांना डेल्टा वेरिएंटचे निदान झाल्यानंतर त्यांचे सॅपल्स जिनोम सीक्वेन्सिंग (Genome Sequencing) साठी पुणे येथे पाठवण्यात आले असल्याची माहिती नाशिक जिल्हा रूग्णालयामधील सर्जन डॉ. किशोर श्रीनिवास (Dr Kishore Shrinivas) यांनी दिली आहे.
यापैकी बहुतांश रुग्ण हे सिन्नर तालुक्यातील असून काही रुग्ण निफाड, नांदगाव, येवला आणि चांदवड तालुक्यातील आहेत. तर दोन सॅपल्स नाशिक शहरातील आहेत, अशी माहिती प्रयोगशाळेच्या चाचणीसाठी जिल्हा नोडल अधिकारी डॉ उत्कर्ष दुधेडिया यांनी दिली आहे. यामुळे पॅनिक होण्याची गरज नाही परंतु कोरोनाचे सर्व नियम पाळणे, मास्क घालणे गरजचे असल्याचेही ते पुढे म्हणाले.
ANI Tweet:
डेल्टा पॉझिटीव्ह रुग्णांसोबत आरोग्य टीम संपर्कात आहे, असे सिव्हिल हॉस्पिटलचे नोडल अधिकारी अनंत पवार यांनी सांगितले. विशेष म्हणजे या सर्व रुग्णांना सौम्य संसर्ग झाला असून ते asymptomatic आहेत. सध्या ते होम आयसोलेशन मध्ये आहेत, असेही ते म्हणाले. दरम्यान, डेल्टा वेरिएंट सर्वप्रथम भारतात आढळला असून त्याचा 135 देशांत प्रसार झाला आहे.