Narayan Rane: संजय राऊत यांच्या पत्नीला ईडीने पाठवलेल्या नोटीसला नारायण राणे यांचे समर्थन

शिवसेना नेते खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना सक्तवसुली संचालनालयाने (ED) रविवारी समन्स बजावले आहे.

Sanjay Raut, Narayan Rane (Photo Credit: PTI)

शिवसेना नेते खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना सक्तवसुली संचालनालयाने (ED) रविवारी समन्स बजावले आहे. पीएमसी बँक घोटाळ्याप्रकरणी त्यांना ही नोटीस बजावण्यात आली आहे. मात्र, आता ईडीच्या या समन्सवरुन शिवसेना आणि भाजपा यांच्यात शाब्दिक चकमक सुरु झाली आहे. दरम्यान, वर्षा राऊत यांना इडीची नोटिस आल्यानंतर त्यांनी आज पत्रकार परिषद घेत भाजपवर शाब्दिक हल्ला चढवला आहे. महाविकास आघाडी सरकार पाडण्यासाठी भाजप (BJP) ईडीचा वापर करत आहे, असा आरोपही संजय राऊत यांनी केला होता. यावर भाजप नेते नारायण राणे (Narayan Rane) यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. “संजय राऊत नेहमी बडबड करतात, मग जाऊदेना जरा ईडीच्या समोर”, अशा शब्दात त्यांनी निशाणा साधला आहे.

“पीएमसी बँकेत त्यांनी गैरव्यवहार केले आहेत. एक कोटीला घेतलेली मालमत्तेची किंमत आज अकरा ते बारा कोटी आहे. मग ती मालमत्ता एक कोटीत कशी काय मिळाली? असे नारायण राणे म्हणाले आहेत. तसेच त्या बँकेची चौकशी सुरू असताना हे पुरावे मिळाले आहेत. यामुळे ईडीने ही नोटीस दिली. असेच कोणालाही ईडी वैगेरे नोटीस देत नाही", असेही नारायण राणे म्हणाले आहेत. हे देखील वाचा- Devendra Fadnavis On Sanjay Raut: संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा यांना ED ने नोटीस पाठवल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांची दिली अशी प्रतिक्रिया

वर्षा राऊत यांना ईडीची नोटीस आल्यानंतर संजय राऊत यांनी सोमवारी (28 डिसेंबर) दुपारी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली. त्यावेळी त्यांनी भाजपवर सडकून टीका केली आहे. दरम्यान, ते म्हणाले होते की, “आमच्यातील कुणी काहीही केले नाही. नोटीस येऊद्या किंवा नाही येऊ द्या. आम्ही घाबरत नाही, तुम्ही घाबरायला हवे", असे संजय राऊत यांनी भाजपच्या नेत्यांना उद्देशून म्हंटले आहे.