Narayan Rane: नारायण राणे यांच्यामुळे नरेंद्र मोदी यांच्या सत्तेला धोका संभवतो; माजी मंत्र्याचे भाकीत
ही तोफ डागताना राणे यांच्याबाबत भाकीतही केले आहे. 'नारायण राणे हे ज्या पक्षात जातात त्या पक्षाची सत्ता जाते. त्यामुळे नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या सत्तेलाही धोका संभवतो' अशा शब्दात केसरकर यांनी राणे यांच्याबद्दल भाकीत केले आहे.
केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) आणि शिवसेना (Shiv Sena) नेते दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांच्यातील वाद सर्वश्रुत आहे. आगामी काळात हा वाद आणखी वाढण्याची शक्यता आहे. दीपक केसरकर यांनी नारायण राणे यांच्यावर पुन्हा एकदा टीकेची तोफ डागली आहे. ही तोफ डागताना राणे यांच्याबाबत भाकीतही केले आहे. 'नारायण राणे हे ज्या पक्षात जातात त्या पक्षाची सत्ता जाते. त्यामुळे नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या सत्तेलाही धोका संभवतो' अशा शब्दात केसरकर यांनी राणे यांच्याबद्दल भाकीत केले आहे. याशिवाय ही नरेंद्र मोदी यांची भाजपा नसून आता नारायण राणे यांची भाजपा झाली आहे. देवेंद्र फडणवीस यांना नारायण राणे यांना भाजपमध्ये घेऊ नका असे सांगत होतो. मात्र, पुढे काय झाले हे आपण जाणताच, असे म्हणत केसरकर यांनी फडणीस यांनाही टोला लगावला आहे.
नारायण राणे यांनी पापंच इतकी केली आहेत की, ते जिथे जातात तिथे त्यांची सत्ता जाते. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांना मी सांगत होतो की, नारायण राणे यांना घेऊ नका. त्यांनी माझे ऐकले नाही. पुढे काय झाले हे आपण जाणताच, असे दीपक केसरकर यांनी म्हटले आहे. आपली नरेंद्र मोदी यांच्याशी ओळख नाही. मात्र, भविष्यात राणे यांच्यामुळे त्यांना धोका होऊ शकतो. मोठ्यातील मोठ्या माणसाची सत्ता घालविण्याची ताकद राणे यांच्या मध्ये असल्याचेही दीपक केसरकर यांनी या वेळी म्हटले. (हेही वाचा, Ramdas Kadam on Anil Parab: शिवसेना नेते रामदास कदम यांचे अनिल परब यांच्यावर जोरदार टीकास्त्र, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना लिहिलेले पत्रही व्हायरल)
श्रीधर नाईक हत्येची आठवण
दीपक केसरकर यांनी श्रीधर नाईक यांच्या हत्येची आठवण काढत कोकणातील राजकीय हत्या प्रकरणाचाही उल्लेख केला. जेव्हा केंद्रीय मंत्री इथे येऊन आपण कोणत्याही स्थितीत जिल्हा बँक जिंकणार म्हणतो तेव्हा त्या नेत्याचे कार्यकर्ते सतीश सावंत यांच्या कार्यकर्त्यांवर हल्ला करतात. या आधीही कोकणात असा रक्तरंजित इतिहास घडला आहे. त्या वेळी श्रीधर नाईक यांचा बळी गेला होता. त्याची हत्या करण्यात आली होती, असेही केसरकर यांनी म्हटले.