Narayan Rane on Sanjay Raut: संजय राऊत धमक्या देणे बंद करा कोणी भीक नाही घालत तुमच्या धमक्यांना- नारायण राणे

या आरोपाला भाजपकडून जोरदार प्रत्युत्तर देण्यात आले. विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस ते केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांच्यापर्यंत अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या.

Sanjay Raut on Narayan Rane | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

शिवसेना (Shiv Sena) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी भाजप आणि ईडीवर आक्रमक होत आरोप केले. या आरोपाला भाजपकडून जोरदार प्रत्युत्तर देण्यात आले. विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस ते केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांच्यापर्यंत अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या. केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane on Sanjay Raut) यांनी ट्विटरच्या माध्यमातून संजय राऊत यांच्यावर हल्ला केला आहे. नारायण राणे यांनी 'तुमची जागा बाहेर नाही आता “आत” तेव्हा संजय राऊत धमक्या देणे बंद करा कोणी भीक नाही घालत तुमच्या धमक्यांना आणि भाजपवाले तर नाहीच नाही', असे ट्विटरच्या माध्यमातून म्हटले आहे. तसेच, हे ट्विट त्यांनी संजय राऊत यांनाही टॅग केले आहे.

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी संजय राऊत यांच्यावर निशाणा साधत म्हटले आहे की, 'संजय राऊत यांचे वक्तव्य मुंबईचा दादा “ शिवसेना ” पण ती फक्त “मातोश्रीपुरतीच ”. गुन्हे करायचे आणि मी नाही त्यातला असे म्हणायचे ही वेळ संजय राऊत यांच्यावर आली आहे. धमक्या देण्याचे दिवस संजय राऊत आता संपले आहेत. तुमची जागा बाहेर नाही आता “आत” तेव्हा संजय राऊत धमक्या देणे बंद करा कोणी भीक नाही घालत तुमच्या धमक्यांना आणि भाजपवाले तर नाहीच नाही.' (हेही वाचा, Nawab Malik On Devendra Fadnavis: हा सगळा खेळ देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून सुरू, नवाब मलिक यांची फडणवीस यांच्यावर टीका)

संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत बोलताना म्हटले होते की, उपराष्ट्रपतींना लिहिलेले पत्र ही केवळ माहिती आहे. हा ट्रेलरसुद्धा नाही. येत्या काही काळात ईडी कार्यालयासमोर आपण पत्रकार परिषद घेणार आहोत. इडी कार्यालयात कोणालाही जाण्याची परवानगी नसते. पण काही राजकीय लोक ईडी कार्यालयात जातात. ईडीला मार्गद्शन करतात. मी हे देवेंद्र फडणवीस यांना सांगतो आहे. त्यांना माहिती आहे, मला काय म्हणायचे आहे. आम्ही जेव्हा तुमच्या घरात घुसू तेव्हा तुम्हाला नागपूरपर्यंत जायचेही कळणार नाही, असेही संजय राऊत यांनी म्हटले होते.

ट्विट

दरम्यान, संजय राऊत यांच्या आरोपाबाबत बोलताना दवेंद्र फडणवीस यांनी म्हटले की, 'शेर कभी गिदड की धमकी को डरता नही'. संजय राऊत हे आता व्हिक्टीम कार्ड खेळत असल्याचा आरोपही देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.