Narayan Rane On Balasaheb Thackeray: 'मातोश्री'च्या बाहेर मच्छर मारत बसायचो: नारायण राणे

त्यामुळे बाळासाहेब ठाकरे अज्ञात स्थळी गेले होते. त्यावेळी मी त्यांच्यासोबत होतो. बाळासाहेब जोपर्यंत अज्ञातवासात होते तोपर्यंत मी झोपलो नव्हतो. रात्री वाहनातच झोपायचो. कुठून तरी खायला आणायचो. कधी कधी माँसाहेब डबा पाठवायच्या अशी आठवण राणे यांनी सांगितली.

Narayan Rane | Photo Credits: Facebook)

शिवसेना (Shiv Sena) प्रमुख बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांना आम्ही बंदोबस्त द्यायचो तेव्हा आम्ही मोतोश्रीच्या बाहेर रात्रभर मच्छर मारत बसायचो. वांद्र्याला किती मच्छर असतात तुम्हाला माहिती आहे, अशा शब्दात नारायण राणे (Narayan Rane) यांनी एक आठवण सांगितली आहे. जन आशीर्वाद यात्रेची आज सांगता होत असताना ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवाला धोका होता. शरद पवार (Sharad Pawar) यांनी तसा फोन केला होता. त्यांनी बाळासाहेबांना मातोश्री (Matoshree) सोडायला सांगितले होते. त्या वेळी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी मला फोन केला. उद्धव ठाकरे यांना नाही, असे नारायण राणे यांनी म्हटले आहे.

बाळासाहेबांनी मला सांगितले की, मी घरातून बाहेर पडलो की तुझ्या गाड्या मागे आल्या पाहिजेत. ते मला अज्ञात स्थळी घेऊन गेले, असा दावा नारायण राणे यांनी केला आहे. नारायण राणे यांनी शिवसेनेत असतानाचे अनेक किस्से प्रसारमाध्यमांशी शेअर केले.

नारायण राणे यांनी म्हटले की, वाद्र्यातील जो नाला आहे ज्याला मिठी नदी म्हटले जाते. सध्या साफ होत नाही. आता मी इतकेच म्हणने बस्स करा. महाराष्ट्राशी संबंधीत काही कामे असतील तर इतर कोणतीही गोष्ट ध्यानात न ठेवता महाराष्ट्रातील कामांना प्राधान्य देईन असेही राणे म्हणाले. (हेही वाचा, होता तेव्हा..!, नारायण राणे यांचा दावा)

नारायण राणे यांनी सांगितले की, बाळासाहेब ठाकरे यांना दहशतवाद्यांकडून धोका होता. त्यामुळे बाळासाहेब ठाकरे अज्ञात स्थळी गेले होते. त्यावेळी मी त्यांच्यासोबत होतो. बाळासाहेब जोपर्यंत अज्ञातवासात होते तोपर्यंत मी झोपलो नव्हतो. रात्री वाहनातच झोपायचो. कुठून तरी खायला आणायचो. कधी कधी माँसाहेब डबा पाठवायच्या अशी आठवण राणे यांनी सांगितली.