शिवसेना-भाजप युतीला 25 पेक्षा जास्त जागा मिळणार नाहीत - नारायण राणे यांचे भाकीत
नारायण राणेंनी काल महराष्ट्रात आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांसाठी झालेल्या युतीवर शिवसेनाच्या बदलत्या भूमिकेवर पुन्हा टीका केली आहे.
Narayan Rane on Shiv Sena BJP Allience: आगामी लोकसभा (Lok Sabha) आणि विधानसभा (Vidhan Sabha) निवडणूकांची धामधूम सुरू झाली आहे. यामध्ये महाराष्ट्रात महाआघाडी आणि शिवसेना व भाजपाची युती(Shiv Sena BJP Allience) झाल्यानंतर आता नारायण राणे (Narayan rane) नेमकं काय करणार? याची अनेकांना उत्सुकता लागली होती. आज पत्रकारपरिषद घेत भाजपाच्या जाहीरनाम्यातून बाहेर पडून नारायण राणेंनी स्वतंत्र जाहीरनाम्याची घोषणा केली आहे. मात्र भाजपापासून दूर राहणार असलो तरीही भाजपावर टीका करणं टाळणार असल्याची कबुली नारायण राणे यांनी दिली आहे.
नारायण राणेंनी काल महराष्ट्रात आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांसाठी झालेल्या युतीवर शिवसेनाच्या बदलत्या भूमिकेवर पुन्हा टीका केली आहे. शिवसेनचा स्वबळाचा नारा ते नाणार प्रकल्पात शेतकर्यांच्या मदतीला खरंच शिवसेना आली का? याबद्दल टीका करण्यात आली आहे. आगामी निवडणुकांमध्ये शिवसेना आणि भाजपा युती फार चांगली कामगिरी करू शकणार नाही असे भाकीत राणेंनी केले आहे. युतीला फार फार 25 जागा मिळतील. शिवसेनेच्या पराभवासाठी महाराष्ट्र स्वाभिमानी पक्ष प्रयत्न करेन असा इशाराही त्यांनी दिला आहे. अखेर भाजप-शिवसेना युती झालीच, जनभावनेचा आदर राखत आगामी निवडणुक एकत्र लढवण्याचा निर्णय