सावंतवाडी नगरपरिषद नगराध्यक्ष पद निवडणूक 2019: शिवसेना पराभूत; नारायण राणे समर्थक भाजप उमेदवार संजू परब विजयी
यातच सावंतवाडी नगरपरिषद निवडणुकीत नारायण राणे (Narayan Rane) यांचे समर्थक संजू परब (Sanju Parab) यांचा विजय झाला आहे.
सावंतवाडी (Sawantwadi) आणि रत्नागिरी (Ratnagiri) नगरपरिषद निवडणुकीच्या (Municipal Council elections) मतमोजणीला सुरुवात झाली. यातच सावंतवाडी नगरपरिषद निवडणुकीत नारायण राणे (Narayan Rane) यांचे समर्थक संजू परब (Sanju Parab) यांचा विजय झाला आहे. आतापर्यंत सावंतवाडी नगरपरिषदेत शिवसेना पक्षाचे नेते दिपक केसरकर (Deepak Kesarkar) यांचे वर्चस्व पाहायला मिळाले. मात्र, सावंतवाडी नगरपरिषद निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे नेते संजू परब यांनी 313 मतांनी विजय मिळवून शिवसेनेवर मात केली. तब्बल 28 वर्षानंतर सावंतवाडी नगरपरिषद निवडणुकीत शिवसेनेचा पराभव झाला आहे. यामुळे हा पराभव केसरकर यांच्यासह शिवसेनेसाठी मोठा धक्का मानला जात आहे.
सावंतवाडी नगरपरिषद निवडणुकीकडे संपूर्ण कोकणातील जनतेचे लक्ष लागले होते. कारण भाजप नेते नारायण राणे आणि दिपक केसरकर यांच्यात चांगलेच राजकारण रंगले होते. सावंतवाडी नगरपरिषदेत केवळ 18 हजार मतदार असले तरी इथे नारायण राणे आणि दीपक केसरकर यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. दरम्यान, नारायण राणे आणि दिपक केसर यांनी या निवडणुकीत एकमेकांवर टीका करण्याची कोणतीही संधी सोडली नाही. महत्वाचे म्हणजे, गेल्या अनेक वर्षांपासून शिवसेना पक्षाने सावंतवाडी नगरपरिषद निवडणुकीत विजय मिळवत आले आहेत. यामुळे या निवडणुकीतही शिवसेना पक्षाचा विजय होईल, अशा चर्चांनी जोर धरला होता. मात्र, या निवडणुकीत भाजपचे नेते संजू परब यांनी शिवसेनेचे उमेदवार दिपक केसरकर यांचा पराभव करुन राजकारणाला नवे वळण दिले आहे. हे देखील वाचा-Maharashtra Cabinet Ministers List 2019: अशोक चव्हाण, धनंजय मुंडे ते आदित्य ठाकरे; 25 कॅबिनेट आणि 10 राज्यमंत्री सह महाविकास आघाडीचा आज पहिला मंत्रिमंडळ विस्तार; इथे पहा संपूर्ण यादी
एकीकडे नारायण राणे यांनी शिवसेना पक्षाला सोडचिठ्ठी दिल्यानंतर कोकणातून सातत्याने त्यांचा शिवसेनेसोबत संघर्ष पाहायला मिळाला आहे. दुसरीकडे, 2014 विधानसभा निवडणूक होण्याअगोदर दिपक केसरकर यानी राष्ट्रवादीतून शिवसेनेत प्रवेश केला होता. यानंतर नारायण राणे आणि दिपक केसरकर यांच्यात सामना रंगायला सुरुवात झाली. आज सावंतवाडी नगरपरिषद निवडणुकीत भाजपने शिवसेनेचा पराभव केल्यामुळे भाजप कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.