Maharashtra Assembly Election 2019: 'तुझ्या बापाला तुरुंगात घातल्याशीवाय स्वस्थ बसणार नाही', अशी प्रणिती शिंदे यांना विरोधी उमेदवाराने दिली धमकी
आगामी विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे या त्यांच्या थेट प्रतिस्पर्धी उमेदवार असल्याने त्यांनी आजच्या भाषणात प्रणिती यांनी धमकी दिली आहे.
सध्या निवडणुकांच्या रणधुमाळीत अनेक राजकीय नेते एकमेकांवर टीका करताना दिसत आहेत. ज्येष्ठ कम्युनिष्ट नेते आणि माजी आमदार नरसय्या आडम यांनी आज भर प्रचार सभेत एक वादग्रस्त विधान केले.
आगामी विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे या त्यांच्या थेट प्रतिस्पर्धी उमेदवार असल्याने त्यांनी आजच्या भाषणात प्रणिती यांनी धमकी दिली आहे. "तुझ्या बापाला तुरुंगात घातल्याशीवाय स्वस्थ बसणार नाही" असं विधान आडम मास्तर यांनी त्यांच्या भाषणात केले.
इतक्यावरच न थांबता ते म्हणाले, "जो पंतप्रधानाला सोलापूरात आणू शकतो तो कोणालाही जेलमध्ये घालू शकतो. माझ्यावर 170 केसेस आहेत त्या 200 झाल्याशिवाय गप्प बसणार नाही. हे गुन्हे म्हणजे माझ्यासाठी अलंकार आहेत."
प्रणिती शिंदे या काँग्रेस पक्षाकडून तर नरसय्या आडम हे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाकडून सोलापूर मध्य या विधानसभा मतदार संघातून एकमेकांविरोधात लढत देत आहेत.