चारित्र्याच्या संशयावरुन मारहाण करणाऱ्या नवऱ्याला बायकोने घडवली अद्दल, दिले विजेचे शॉक

तर अद्दल घडवण्यासाठी चक्क महिलेने नवऱ्याला विजेचे शॉक दिले

प्रतिकात्मक फोटो (फोटो सौजन्य-Facebook)

नांदेड (Nanded) येथे एका विवाहित महिलेने नवरा चारित्र्यावरुन संशय घेत मारहाण करत असल्याने त्याला अद्दल घडवली. तर अद्दल घडवण्यासाठी चक्क महिलेने नवऱ्याला विजेचे शॉक दिले असल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. मात्र नवऱ्याचा या प्रकरणी मृत्यू झाला आहे.

बायकोवर चारित्र्याच्या संशय घेत असल्याने दोघांमध्ये नेहमीच वाद होत असत. परंतु शनिवारी या दोघांचा वाद एवढा विकोपाला केला की बायकोने घराबाहेर पत्र्याच्या शेडवर असलेली विजेची वायर काढली. तर विज प्रवाह त्यावेळी सुरु होताच. बायकोने या प्रकारावर संतप्त होत विज प्रवाह सुरु ठेवत नवऱ्याला ओढलेल्या वायरने शॉक दिले. मात्र हा प्रकार कोणाला कळू नये म्हणून तिने पोलिसांना कळताच त्यांची सुद्धा बायकोने दिशाभूल केली.

(शिर्डी: Tik Tok चा आणखीन एक बळी, व्हिडीओ बनवताना चुकून गोळी चालवली गेल्याने अल्पवयीन मुलाचा मृत्यू)

परंतु नवऱ्याच्या बहिणीला महिलेचा संशय आल्याने तिच्या विरोधात तक्रार दाखल केसी. त्यानंतर पोलिसांनी पुन्हा एकदा या प्रकाराचा तपास करण्यास सुरुवात केली असता तिने पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला असल्याचे पोलिसांना कळले. त्यामुळे पोलिसांनी महिलेला अटक केली आहे.