Nanded Rain: नांदेड जिल्ह्याला पूराचा फटला, 378 नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविले
विशेष म्हणजे, जिल्हा प्रशासन प्रत्येक परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. बचाव कार्य करण्यासाठी देखील टीम तैनात असल्याची माहिती आहे.
मागील काही दिवसांपासून राज्यामध्ये अनेक भागात मुसळधार पाऊस हा पडत आहे. नांदेड (Nanded) जिल्ह्यातही होणाऱ्या जोरदार पावसामुळे जनजीवन विस्कळीत होत आहे. मागील काही दिवसांपासून जिल्ह्यात अनेक भागात जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. ज्यात जिल्ह्यातील 57 मंडळात अतिवृष्टीची नोंद करण्यात आली आहे. अनेक ठिकाणी नदी नाल्यांना पूर आले आहे. तर शेकडो एकर पाण्याखाली गेल्याची परिस्थिती आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले आहे. विशेष म्हणजे, जिल्हा प्रशासन प्रत्येक परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. बचाव कार्य करण्यासाठी देखील टीम तैनात असल्याची माहिती आहे. (हेही वाचा - Chandrapur Flood: विदर्भातील वर्धा नदीला पूर, वर्धा नदीच्या काठावरील नागरिकांना सर्तकेचा इशारा)
सद्यस्थितीत नांदेड जिल्ह्यात पाऊस थांबलेला आहे. किनवट तालुक्यातील चिखली खु. येथे नाल्याचा पूर ओसरला आहे, परंतु रस्ता बंद आहे. पर्यायी मार्गाने वाहतूक चालू आहे. बेल्लोरी किनवट येथील बेलोरी नाल्या वरून एक व्यक्ती वाहुन गेली असून, ज्यांचे नाव अशोक पोशट्टी दोनेवार आहे. भोई समाजाचे लोक मदतीला घेऊन शोध बचावकार्य चालू होते.
उमरी मुदखेड रस्ता रेल्वे पुलाच्या खाली पाणी असल्यामुळे मागील 8 दिवसापासून बंद आहे. धर्माबाद तालुक्यातील बनाळी येथे अति पावसामुळे 60 ते 70 कुटुंबाचे दोन बसेस द्वारे धर्माबाद येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये स्थलांतर करण्यात आलेले आहे.