Nanded Gurudwara Attack: होल्ला मोहल्ला मिरवणूकी दरम्यान पोलिसांवर हल्ला करणारे 17 जण ताब्यात अज्ञातांविरूद्ध गुन्हा दाखल
यंदा देखील त्याचे आयोजन करण्यात आले होते मात्र वाढतं कोरोना संक्रमण पाहता या कार्यक्रमाला परवानगी नाकारण्यात आली होती.
नांदेड मध्ये काल (29 मार्च) होळीच्या दिवशी रंगोत्सवाला गालबोट लागणारी घटना घडली आहे. काल नांदेडात शीख समुदयाकडून (Sikh Community) काढण्यात आलेल्या जंगी मिरवणूकीवर पोलिसांवर हल्ला करण्यात आला आहे. या प्रकरणी आता नांदेड पोलिसांनी (Nanded Police) 17 जणांना ताब्यात घेतले आहे. तर काही अज्ञातांविरूद्ध एफआयआर (FIR) दाखल केले असून त्यांच्यावर दंगल उसळवण्याचे आणि खूनाच्या प्रयत्नाचे आरोप ठेवण्यात आले आहेत. दरम्यान काल घडलेल्या या घटनेमध्ये 4 पोलिस कर्मचारी गंभीररित्या जखमी झाले आहेत. नक्की वाचा - Nanded: होला मोहल्ला कार्यक्रमात शीख तरुणांचा पोलिसांवर हल्ला; 4 पोलिस जखमी.
नांदेड मध्ये होळीच्या दिवशी दरवर्षी शीख समुदाय होला मोहल्ला कार्यक्रमाचे आयोजन करतात. यंदा देखील त्याचे आयोजन करण्यात आले होते मात्र वाढतं कोरोना संक्रमण पाहता या कार्यक्रमाला परवानगी नाकारण्यात आली होती. पण मोठ्या प्रमाणात शीख समुदाय एकत्र आला अनेकांनी मास्क न घालता तसेच सोशल डिस्टंसिंगच्या नियम धाब्यावर बसवत कार्यक्रमात सहभाग घेतला होता. सध्या लॉकडाऊन असल्याने पोलिसांकडून बॅरिकेटिंग देखील करण्यात आले होते पण ते बॅरिकेट्स तोडत शीख तरूण पुढे आले आणि त्यांनी पोलिसांवर नंग्या तलवारी चालवल्या. गाड्यांची तोडफोड केली. यामध्ये 4 पोलिस कर्मचारी गंभीर जखमी झाले आहेत.
ANI Tweet
नांदेड मध्ये सध्या वाढत्या कोरोना प्रादुर्भावामुळे लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. तर संपूर्ण राज्यामध्ये रात्री 8 नंतर कर्फ्यू लागू करण्यात आला आहे. नांदेड मध्ये 25 मार्च पासून 4 एप्रिल पर्यंत कडक लॉकडाऊन आहे.