स्थानिक निवडणूकींंसाठी कॉंग्रेस सज्ज, Nana Patole यांच्याकडे महाराष्ट्र कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी सोबतच 'या' दिग्गज नेत्यांकडे महत्त्वपूर्ण जबाबदारी
आज कॉंग्रेसने नाना पाटोले यांच्या सोबत 6 कार्यध्यक्षांची देखील यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे.
नाना पटोले (Nana Patole) यांची महाराष्ट्र कॉंग्रेस प्रदेशाध्यक्षपदी (Maharashtra Congress Chief) निवड करण्यात आली आहे. आज कॉंग्रेसने नाना पाटोले यांच्या सोबत 6 कार्यध्यक्षांची देखील यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. काल संध्याकाळीच नाना पटोले यांनी विधानसभा अध्यक्ष पदाचा राजीनामा दिला होता. मागील काही दिवसांपासून नाना पाटोलेंच्या नावाची चर्चा होती आता अखेर त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे.
महाराष्ट्रात सहा कार्याध्यक्षांच्या यादीमध्ये प्रणिती शिंदे, चंद्रकांत हांडोरे, कृणाल पाटील, शिवाजीराव मोघे,बसवराज पाटील, नसीम खान यांचा समावेश आहे. सोबतच 10 उपाध्यक्षपदाचे चेहरे जाहीर केले आहेत दरम्यान या यादी मधून कॉंग्रेसच्या विद्यमान कार्याथ्यक्ष यशोमती ठाकूर, विश्वजित कदम यांना वगळण्यात आले आहे. नक्की वाचा: बाळासाहेब थोरात यांची उपमुख्यमंत्री पदी लागू शकते वर्णी? पहा काय म्हणाले अजित पवार.
कॉंग्रेसचे ट्वीट
नाना पटोले हे विदर्भातील नेते आहे. काही वर्षांपूर्वी त्यांनी कॉंग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजपा मध्ये प्रवेश केला होता मात्र 2014 मध्येच त्यांनी भाजपा ऐन फॉर्मत असताना भाजपाला रामराम करत पुन्हा कॉंग्रेसमध्ये परतले होते. गुजरातमध्ये राहुल गांधींच्या उपस्थितीमध्ये ते कॉंग्रेसमध्ये परतले होते. त्यांच्या कॉंग्रेस मधील घरवापसी मध्ये राजीव सातव यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती. 2019 मध्ये विधानसभा निवडणूक पार पडल्यानंतर त्यांच्या गळ्यात विधानसभा अध्यक्ष पदाची माळ पडली होती मात्र आता कॉंग्रेसला मजबूत करण्यासाठी आता नाना पटोलेंकडे कॉंग्रेस प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी सोपावण्यात आली आहे.
दरम्यान महाराष्ट्रात बाळासाहेब थोरात यांच्यानंतर प्रदेशाध्यक्ष पदाची धुरा नाना पटोले सांभाळणार आहेत. त्यांच्या बेधडक व्यक्तिमत्त्वाने राज्यात आणि महाविकास आघाडी मधील कॉंग्रेसचा आवाज बुलंद करण्याचा पक्षाचा प्रयत्न आहे. येत्या काही काळात महाराष्ट्रात 5 महत्त्वाच्या महानगरपालिकांच्या निवडणूका आहे. यामध्ये नवी मुंबई, औरंगाबाद याचा समावेश आहे.