Nalasopara Shocker: नालासोपारा मध्ये ज्वेलरची दिवसा ढवळ्या निर्घुण हत्या

तर 10 जणांची विशेष टीम या हत्येमधील सहभागी आरोपींचा शोध घेण्यासाठी तैनात करण्यात आले आहेत.

Crime | (Photo Credits: PixaBay)

नालासोपारा मध्ये शनिवार,22 ऑगस्ट दिवशी एका खूनामुळे खळबळ पसरली आहे. या घटनेमध्ये 2 अज्ञात व्यक्तींकडून 48 वर्षीय एका ज्वेलरची हत्या करण्यात आली आहे. ANI वृत्तानुसार, पोलिसांनी दिलेल्या माहितीमध्ये किशोर जैन या मृत व्यक्तीचे हात-पाय बांधलेले होते. त्यानंतर धारदार वस्तूने 12 वेळेस त्याच्या डोक्यात आणि चेहर्‍यावर हल्ला करण्यात आला होता. दरम्यान हा खून ज्वेलरला लुटण्याच्या प्रयत्नांमधून झाला असावा असं सांगण्यात आले आहे. Mira Road: शस्रांचा धाक दाखवत चार चोरट्यांकडून ज्वेलरीच्या दुकानातून 2 कोटी सोन्यासह डायमंडची चोरी.

दिवसाढवळ्या 2 व्यक्ती नालासोपाराच्या साक्षी ज्वेलर्स मध्ये ग्राहक म्हणून आले होते. ही सकाळी 11 वाजल्याच्या सुमाराची घटना आहे. सकाळी नुकतचं दुकान उघडताच ही घटना घडली. पोलिसांनी आरोपी दोन्ही व्यक्ती अंदाजे 20 मिनिटं दुकानात होती असं सांगण्यात आले आहे.

हल्ला केल्यानंतर त्या व्यक्तींनी लॉकर उघडण्याचा प्रयत्न केला पण ते अयशस्वी ठरले आणि पळून गेले. जवळच असलेला एक दुकानदार तासाभराने हा प्रकार पाहण्यासाठी आला तेव्हा ज्वेलर रक्ताच्या थारोळ्यात पडलेला दिसला. नंतर जैन याला नजिकच्या रूग्णालयात आणण्यात आले पण हॉस्पिटलमधे दाखल होण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता अशी माहिती नालासोपारा पोलिसांनी दिली आहे.

आयपीसी कलमांनुसार, 302, 392, 397 आणि 34 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर 10 जणांची विशेष टीम या हत्येमधील सहभागी आरोपींचा शोध घेण्यासाठी तैनात करण्यात आले आहेत.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif