Nalasopara Shocker: विहिरीत पोहायला जाणे बेतले जीवावर, नालासोपारा येथे दोन तरुणांचा मृत्यू
तसेच पोलिसांनी दोघांचेही मृतदेह जवळच्या शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आले,
राज्यभरात बकरी ईद सणाचा उत्साह पाहायला मिळत असतानाच नालासोपाऱ्यात एक दुर्देवी घटना समोर आली आहे. नालासोपाऱ्यातील तूलिंज स्मशानभूमी परिसरात पोहायला गेलेल्या दोन तरुणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. दनान शेख (वय,22) आणि अमान खान (वय, 18) अशी या घटनेत मृत्यू झालेल्यांची नावे आहेत. या घटनेने परिसरात सर्वत्र शोकाकुळ वातावरण पहायला मिळत आहे. (हेही वाचा - Maharashtra Rain Alert: हवामान विभागाकडून राज्यातील सहा जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट, मुंबईसह उपनगरात अतिमुसळधार पावसाची शक्यता)
दरम्यान घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. अग्निशमन दलाच्या जवानांनी दोघांचेही मृतदेह बाहेर काढले आहेत. तसेच पोलिसांनी दोघांचेही मृतदेह जवळच्या शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आले, यावेळी या दोघांना रुग्णालयात मृत घोषीत करण्यात आले. आज बकरी ईद सण असल्याने परिसरात उत्साह पहायला मिळाला होता. पंरतू या घटनेने या परिसरात सर्वत्र हळहळ व्यक्त करताना पहायला मिळाले.
या घटनेनंतर अनेक नागरिकांनी विहिरीजवळ धाव घेतली आणी या दोघांच्या कुटुंबियांवर दुखाचा डोंगर कोसळला असून दोन तरुण मुलांच्या मृत्यू मुळे सर्वच गावावर शोककळा पसरलेली पहायला मिळाली.