Nagpur Stampede at BJP Event: नागपूरातील भाजपच्या कार्यक्रमात चेंगराचेंगरी, एक वृद्ध महिलेचा मृत्यू तर 10 जखमी
आज सकाळी 10 वाजल्यापासून शिबीराची वेळ होती. मात्र सकाळी सात वाजल्यापासूनच सुरेश भट सभागृहासमोर लाभार्थ्यांची गर्दी जमली होती.
नागपूर भाजपतर्फे बांधकाम कामगारांसाठी आयोजित शिबीरात चेंगराचंगरीची घटना घडली आहे. या घटनेत एका वृद्ध महिलेचा मृत्यू झाला असून आठ ते दहा महिला जखमी झाल्या आहेत. आज सकाळी अकरा वाजताच्या सुमारास शहरातील कविवर्य सुरेश भट सभागृहात ही घटना घडली आहे. या घटनेत एक वृद्ध महिला मनूबाई तुळशीराम राजपूत या महिलाचा मृत्यू झाला आहे. नागपूरात स्वयंपाकघर व इतर आवश्यक सामानाच्या वितरणासाठी शिबीर आयोजित करण्यात आले होते. पंरतू या कार्यक्रमात मोठ्या प्रमाणावर महिलांची गर्दी झाली होती. या कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आयोजकांना अपयश आले. (हेही वाचा - Nagpur Crime: प्रेम प्रकरणातून चाकूने 25 वेळा वार करून मित्राची हत्या, आरोपींना अटक)
पाहा पोस्ट -
Maharashtra: 50-Year-Old Woman Killed, Four Injured in Stampede at BJP Event in Nagpur#Maharashtra #BJP #Nagpur #Accident https://t.co/M4ZjWaTrbb
— LatestLY (@latestly) March 9, 2024
आज सकाळी 10 वाजल्यापासून शिबीराची वेळ होती. मात्र सकाळी सात वाजल्यापासूनच सुरेश भट सभागृहासमोर लाभार्थ्यांची गर्दी जमली होती. हजारो लोक बाहेर उभे होते. सकाळी सव्वा दहा वाजेनंतर सभागृहाचे दार उघडले असता आज जाण्यासाठी सर्वांनी धाव घेतली. त्यात गर्दी झाली व काही महिला खाली पडल्या. यावेळी चेंगराचेंगरी झाली आणि खाली पडलेल्या महिलांच्या अंगावरुन अनेक जण गेले.
यावेळी जखमी महिलांना तातडीने मेडिकल हॉस्पिटलमध्ये घेऊन जाण्यात आले. या ठिकाणी डॉक्टरांनी मनुबाईंना मृत घोषित केले. काही जखमी महिलांचा उपचार सुरू आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळाकडे धाव घेतली.
(The above story first appeared on LatestLY on Mar 09, 2024 03:46 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

