Nagpur Shocker: पत्नीसह मुलीची गळा चिरून हत्या केल्यानंतर पतीने गळफास घेत संपवलं जीवन
विलासने रात्री पत्नी आणि मुलीच्या गळ्यावर सुरा फिरवला आणि त्यानंतर स्वतःदेखील आत्महत्या केली आहे.
नागपूर (Nagpur) शहरामध्ये एका व्यक्तीने पत्नी, लेकीची हत्या केल्यानंतर स्वतः आत्महत्या कर्त जीवन संपवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मीडीया रिपोर्ट्सनुसार या व्यक्तीने पत्नी आणि आपल्या 13 वर्षीय मुलीची गळा चिरून हत्या केली आहे. त्यानंतर गळफास घेत आपलं आयुष्य संपवलं. ही घटना नागपूर मधील हिंगणा एमआयडीसी पोलिस स्टेशन अंतर्गत असलेल्या राजीव नगर येथील आहे.
मृत व्यक्तीचं नाव विलास गवते आहे. विलासने रात्री पत्नी आणि मुलीच्या गळ्यावर सुरा फिरवला आणि त्यानंतर स्वतःदेखील आत्महत्या केली आहे. पोलिसांनी तिन्ही मृतदेह हाती घेतले असून त्यांना शाविच्छेदनासाठी पाठवले आहेत. याप्रकरणी पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे. कौटुंबिक वादातून विलास गवते यांनी हे टोकाचे पाऊल उचलले असल्याची प्राथमिक माहिती दिली आहे.
विलास गवते यांच्या मुलीचं वय 13 वर्ष आहे तर पत्नी रंजना गवते 45 वर्षीय होत्या. ही घटना राजीव नगर, तरोडा मोहल्ला परिसरातील आहे.
मागील महिन्यात मुंबई मध्ये 89 वर्षीय एका निवृत्त आर्मी मॅनने त्याच्या 81 वर्षीय पत्नीची आणि 55 वर्षीय मेंटली चॅलेंज मुलीची हत्या केल्याचा प्रकार समोर आला होता. या दोघीही अंथरूणाला खिळलेल्या होत्या. यानंतर आर्मी मॅनने स्वतः पोलिस स्टेशन मध्ये जाऊन खूनाची कबुली देखील दिली आहे. ही घटना अंधेरीच्या शेर ए पंजाब कॉलनीमधिल आहे.