नागपूर (Nagpur) मध्ये एका बलात्कार (Rape Victim) पीडित गर्भवती मुलीचा प्रसुती दरम्यान मृत्यू (Death) झाल्याची धक्कादायक घटना समोर येत आहे. ही घटना खापरखेडा (Khaparkheda) पोलीस ठाण्यांच्या तपासात उघडकीस आली असून याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून रुपेश ऊर्फ फाटा संतोष उईके (Rupesh Uike) या आरोपीला अटक केली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपी हा 20 वर्षीय असून नागपूर च्या इंदिरानगर (Indiranagar) भागातील रहिवासी आहे. कल्याण: दुसरीत शिकणा-या अल्पवयीन मुलीवर सलग 8 महिने सामूहिक बलात्कार, आरोपींमध्ये 2 दुकानमालक आणि एका केटररचा समावेश
बलात्कार झालेली पीडिता १६ वर्षीय असून तिच्या लहानपणीच वडिलांचे निधन झाले होते. आई व दोन भावांसह ती राहत होती. आई व भाऊ मजुरी करायचे. आरोपीने तिला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून गेल्या वर्षभरापासून तिच्यावर अत्याचार केले. तिने नकार दिला असता आई व भावांना जीवे मारण्याची धमकी देत त्याने आपले गैरप्रकार सुरूच ठेवले.या दरम्यान मुलीला गर्भधारणा झाली, नुकताच २१ फेब्रुवारीला तिने घरीच एका बाळाला जन्म दिला. पीडित ही स्वतः अल्पवयीन असल्याने गर्भात मुलाची स्वास्थ बिघडली होती ज्यामुळे त्याचाही मृत्यू झाला, तसेच प्रसूती वेदना सहन ना झाल्याने पीडितेने सुद्धा आपला जीव गमावला आहे.
पोलिसांनी तपासात सांगितलेल्या माहितीनुसार, बाळाला जन्म देताच पीडितेची अवस्था नायनाट खालावत गेली, त्याच दिवशी तिला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले. उपचारादरम्यान 22 फेब्रुवारीला सकाळच्या सुमारास तिचा मृत्यू झाला. मात्र मृत्यूपूर्वी मुलीने बलात्कार प्रकरणाचा खुलासा केल्याने तिच्या जबाबावरून पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली.