मुंबई: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा 'औरंगजेब', तर आदित्य ठाकरे यांचा Baby Penguin उल्लेख करत सोशल मीडियावर आक्षेपार्ह मजकूर; समीत ठक्कर नामक व्यक्तीवर व्ही. पी. रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

या ट्विटमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांची तुलना मुघल राजाशी केली होती.

Uddhav Thackeray, Aditya Thackeray, Nitin Raut | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray), पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) आणि उर्जामंत्री नितीन राऊत (Nitin Raut) यांच्याबद्दल सोशल मीडियावर आक्षेपार्ह मजकूर प्रसिद्ध करुन त्यांची प्रतिमा मलीन करणे एकाला चांगलेच महागात पडले आहे. या प्रकरणात मुंबई (Mumbai) येथील व्ही. पी. रोड पोलीस ठाणे (VP Road Police Station) दप्तरी गुन्हा नोंद करण्यात आला आहे. समीत ठक्कर असे गुन्हा नोंद झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. हा व्यक्ती मूळचा नागपूर (Nagpur) येथील रहिवासी आहे. त्याच्यावर मुंबई शहर पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. आपल्या ट्वीटमध्ये समीतने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा 'औरंगजेब', तर आदित्य ठाकरे यांचा 'Baby Penguin' असा उल्लेख केला होता.

शिवसेना पक्षाचे कायदेशीर सल्लागार धरम मिश्रा यांनी दिलेल्या तक्रारीवरुन समीत ठक्कर यांच्या विरोधात व्ही. पी. रोड पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. प्राप्त माहितीनुसार आक्षेपार्ह लिखाण, लेख, चित्र, चित्रफीत अथवा कथीत माहिती प्रसारित करण्याविरुद्धच्या कायद्यातील विविध कलमांखाली हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. व्ही. पी. रोड पोलिसांनी समीत ठक्कर यांचा जवाब घेण्यासाठी समन्स बजावल्याची माहिती आहे.

दरम्यान, समीत ठक्कर नामक व्यक्तीने सोशल मीडिया व्यासपीठ ट्विटरवरुन जून आणि जुलै महिन्यामध्ये काही ट्विट केली होती. या ट्विटमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांची तुलना मुघल राजाशी केली होती. तसेच, उर्जामंत्री नितीन राऊत यांच्याबद्दलही आक्षेपार्ह टीप्पणी केली होती. ठक्कर याने मंत्र्यांसोबत राज्य सरकारचीही खिल्ली उडवली आणि शिवीगाळही केली होती. त्यामुळे धरम मिश्रा यांनी व्ही. पी. रोड पोलिसांत लेखी तक्रार दिली. त्यावरुन पोलिसांनी कायदेशीर कारवाई केली आहे.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif