Nagpur Lok Sabha Election 2024: नागपूर मतदारसंघात नितीन गडकरी विजयाची करणार हॅट्रिक?; विकास ठाकरेंपुढे मोठ आव्हान

त्यामुळे नागपूरमध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी विजयाची हॅट्रिक करणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

Photo Credit - Meta

Nagpur  Lok Sabha Election 2024: देशातल्या अठराव्या लोकसभा निवडणुकांची मतदानाची (Lok Sabha Election 2024) अखेर सांगता 1 जून रोजी झाली. 4 जून रोजी निकाल जाहीर होणार आहेत. नागपूरची निवडणूक ही अत्यंत प्रतिष्ठेची मानली जात आहे. नागपूरमध्ये नितीन गडकरी (Nitin Gadkari)विरोधात विकास ठाकरे(Vikas Thakre) निवडणूकीच्या रिंगणात आहेत. यंदाच्या निवडणूकीत भाजपेचे दिग्गज नेते नितीन गडकरी (Nitin Gadkari) विजयाची हॅट्रिक करणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. तर, कधीकाळी काँग्रेसचा गड असलेल्या मतदारसंघ काबीज करण्यात काँग्रेसला अपयशी ठरणार असल्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

नितीन गडकरी विजयाची हॅट्रिक करणार

विदर्भातील सर्वात चर्चेची आणि प्रतिष्ठेची मानल्या जाणाऱ्या नागपूर मतदारसंघात यंदा सलाग तिसऱ्यांदा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी निवडणुकीच्या रिंगणात होते. नितीन गडकरी आपल्या विकासकामांच्या जोरावर बहुमताने विजयी होतील, असा दावा भाजपने वेळो वेळी केला होता. तर दुसरीकडे त्यांच्या विरुद्ध महविकास आघाडीने देखील काँग्रेसचे उमेदवार विकास ठाकरे (Vikas Thakre) यांना मैदानात उतरवत ही निवडणूक अधिक रंगत केली.

कोण आहेत विकास ठाकरे

विकास ठाकरे हे विद्यमान आमदार आहेत. ते नागपूर पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात. काँग्रेसचे शहराध्यक्षही आहेत. २००२ मध्ये नगरसेवक, महापौर आणि नंतर महापालिकेतील विरोधी पक्षनेता म्हणूनही त्यांनी काम केले आहे. माजी केंद्रीय मंत्री आणि काँग्रेसचे नेते विलासराव मुत्तेमवार यांचे समर्थक असलेल्या विलास ठाकूर यांची धाडशी आणि धडाकेबाज नेता अशी ओळख आहे. ओबीसी समुदायातून येतात. त्यांचे बी.कॉम पर्यंत शिक्षण झालेले आहे. १९८५ मध्ये विकास ठाकरे काँग्रेस पक्षासोबत जोडले गेले. ते १९८८ मध्ये राष्ट्रीय विद्यार्थी काँग्रेसच्या नागपूर शहराचे महासचिव बनले. १९९० मध्ये ते शहर युवक काँग्रेसचे महासचिव बनले. १९९८ मध्ये विकास ठाकरेंवर विदर्भ काँग्रेसचे अध्यक्ष बनले. त्यानंतर २००२ मध्ये ते नागपूर महापालिकेत नगरसेवक म्हणून निवडून आले.२००२ ते २००५ या काळात ते नागपूरचे महापौर होते. २०१० मध्ये नागपूर महापालिकेत ते विरोधी पक्षनेते बनले. त्यानंतर पुढे २०१२ मध्ये ते पुन्हा नगरसेवक म्हणून निवडून आले. २०१२ ते २०१७ या काळात विकास ठाकरे यांनी महापालिकेत पुन्हा विरोधी पक्षनेता म्हणून काम पाहिले.