Physical Intercourse: शरीरसुख मागणाऱ्या पतीचा बायकोकडून काटा; अनैतिक संबंधाचा आरोप जीवावर बेतला
तेव्हाही तो दारुच्याच नशेत होता. नशेत असलेल्या प्रताप याने पत्नीकडे शीरसुखाची मागणी केली. पतीची ही मागणी चंद्राने फेटाळून लावली. असे असतानाही प्रताप याने पुन्हा तिच्याशी संभोग करण्याचा प्रयत्न केला. परंतू, पत्नी चंद्रा हिने त्यास विरोध केला.
Nagpur Husband Wife Sex News: संभोग (Physical Intercourse) करण्यास नकार देणाऱ्या पत्नीवर अनैतिक संबंधांचे (Extramarital Affair) आरोप करणे एका पतीच्या जीवावर बेतले आहे. नागपूर कळमना परिसरातील बजरंगनगर (Bajrang Nagar in Kalamna) येथे ही घटना घडली. चारित्र्यावर संशय घेणाऱ्या पतीचा पत्नीने आपल्याच मुलाच्या सरकार्याने हत्या केली आहे. पोलिसांनी मृताची पत्नी आणि मुलावर हत्येचा गुन्हा नोंदवून तपास सुरु केला आहे. प्रताप कुळमेथे असे मृताचे नाव आहे. तो 40 वर्षांचा आहे. तर चंद्रा कुळमेथे असे आरोपी महिलेचे नाव आहे. ती 30 वर्षंची आहे. प्रताप आणि चंद्रा यांना दोन अपत्ये आहेत.
प्राताप कुळमेथे याला दारुचे व्यसन होते. तो कायम नशेत तर्रर्र असायचा. त्यातच त्याने एके दिवशी पत्नीला वस्तीतीलच एका तरुणाशी बोलताना पाहिले. तेव्हापासून प्रताप याला पत्नी चंद्रा हिच्यावर चारित्र्याचा संशय घेत असे. चंद्राही सततच्या चारित्र्याच्या संशयाला कंटाळली होती. दरम्यान, 7 मार्च रोजी प्रताप कामावरुन घरी परताला. तेव्हाही तो दारुच्याच नशेत होता. नशेत असलेल्या प्रताप याने पत्नीकडे शीरसुखाची मागणी केली. पतीची ही मागणी चंद्राने फेटाळून लावली. असे असतानाही प्रताप याने पुन्हा तिच्याशी संभोग करण्याचा प्रयत्न केला. परंतू, पत्नी चंद्रा हिने त्यास विरोध केला. (हेही वाचा, Viral Wedding: नवरी वाट पाहून थकली, नवरदेव लग्नच विसरला; घ्या जाणून नेमकं काय घडलं?)
दरम्यान, शरीरसुखाची मागणी आणि नकार यांतून पती प्रताप आणि पत्नी चंद्रा यांच्यात जोरदार वाद निर्माण झाले. त्यातूनच वाद सुरु असताना प्रताप याने पुन्हा एकदा चंद्रावर चारित्र्याचा संशय घेत वस्तीतील तरुणासोबत अनैतिक संबंध असल्याचा आरोप केला. हा विषय निघताच दोघांमधील वाद पुन्हा वाढला. त्यातच प्रतापने घरातील कांदा कापण्याचा चाकू हातात घेत चंद्रावर वार करण्याचा प्रयत्न केला. दारुच्या नशेत असलेल्या प्रतापचा वार चंद्राने चुकवला. यात चाकू पकडताना चंद्राच्या हाताला जखम झाली आणि त्यातून रक्त भळभळू लागे. रक्त पाहून घाबरलेल्या चंद्राने जोरात आरडाओरडा केला. तो ऐकून बाजूच्या खोलीत झोपलेला त्यांचा मुलगा उठला. दरम्यान, प्रतापचे चाकूने वार करण्याचे प्रयत्न सुरुच होते. अशा वेळी चंद्रा आणि तिचा मुलगा अशा मायलेकरांनी प्रताप याच्यावर हल्ला केला. यात वार वर्मी लागल्याने प्रताप गंभीर जखमी झाला. त्याला मेयो रुग्णालयात दाखल केले असता उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करुन तपास सुरु केला आहे.