Nagpur: आजीच्या संपत्तीसह पैशांवर नातीचा डोळा, प्रियकरासोबत मिळून केली हत्या
नागपूर मध्ये एक धक्कादायक आणि हृदय पिळवटून लावणारी एक घटना समोर आली आहे. त्यानुसार एका नातीनेच आजीची हत्या केल्याच्या घटनेने खळबळ उडाली आहे. नातीने आपल्या आजीच्या संपत्तीसह पैशांवर डोळा ठेवत प्रियकराच्या मदतीने तिची हत्या केल्याची माहिती देण्यात आली आहे.
Nagpur: नागपूर मध्ये एक धक्कादायक आणि हृदय पिळवटून लावणारी एक घटना समोर आली आहे. त्यानुसार एका नातीनेच आजीची हत्या केल्याच्या घटनेने खळबळ उडाली आहे. नातीने आपल्या आजीच्या संपत्तीसह पैशांवर डोळा ठेवत प्रियकराच्या मदतीने तिची हत्या केल्याची माहिती देण्यात आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी मुलीचा प्रियकर आणि त्याच्या तीन मित्रांना अटक केली आहे. पण मुलीने घटनेनंतर पळ काढला आहे. मुख्य गोष्ट म्हणजे ही घटना नागपूर मधील एमआयडीसी पोलीस स्थानकाच्या हद्दीत घडली आहे.
सप्तक नगर येथे 63 वर्षीय महिलेचे नाव विजयाबाई तिवलकर असल्याचे सांगण्यात आले आहे. त्या सेवानिवृत्त होत्या आणि घरी एकट्याच राहत होत्या. त्या राखीव पोलीस दलातून सेवानिवृत्त झाल्या होत्या. तर त्यांचा मुलगा एसआरपीएफमध्ये नोकरीवर रुजू असून तो हिंगणा येथे पोस्टिंगसाठी आहे.तर विजयाबाई या मुलापासून एकट्याच वेगळ्या राहत होत्या.(Thane: ठाण्यात अनैतिक संबंधातून तरुणाची हत्या, दिव्याच्या खाडीत मृतदेह फेकणाऱ्या 2 जणांना अटक)
विजयाबाई यांची हत्या होण्याच्या आधी त्यांनी शेजाऱ्यांसोबत बातचीत सुद्धा केली. परंतु दुसऱ्या दिवशी त्या घराबाहेर पडल्याच नाही त्यामुळे त्यांच्या घरी काम करणाऱ्या बाई आल्या. त्यांनी घरातील जे दृष्ट पाहिले ते पाहता त्यांना विश्वासच बसत नव्हता. विजयाबाई यांची हत्या करण्यात आली होती आणि त्या रक्ताच्या थारोळ्यात पडल्या होत्या. याबद्दल बाईंनी शेजाऱ्यांना सांगितले असता त्यांना तातडीने पोलिसांना या प्रकरणाबद्दल सांगितले.(धक्कादायक! अंत्यसंस्काराची तयारी सुरु असताना जाग्या झाल्या मृत आजी, बारामतीतील मुढाले घटना)
पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असता विजयाबाई यांची हत्या करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. तर त्यांच्या डोक्यावर सुद्धा गंभीर जखमा दिसून आल्या. घरातील सोन्याचे दागिने आणि महाग वस्तू चोरी करण्याच्या उद्देशाने हत्या केल्याचा प्रथम अंदाज लावण्यात आला. परंतु या प्रकरणाची खोल तपासणी केली असता अल्पवयीन नातीनेच त्यांची हत्या केल्याची धक्कादायक बाब समोर आली. नातीचा आजीच्या पैशांसह संपत्तीवर डोळा असून तिने हव्यासापोटी हे पाऊल उचलले. आजीची संपत्ती मिळवत प्रियकरासोबत मौजमजा करता येईल असे तिला वाटले. पण अखेर प्रियकराला ताब्यात घेण्यात आले आहे.
(The above story first appeared on LatestLY on May 16, 2021 08:19 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

