Nagpur Food Poisoning : अंडा बिर्याणी खाल्ल्याने यशवंतपूर एक्स्प्रेसमधील 40 प्रवाशांना विषबाधा; पोटदुखी, उलट्या, जुलाबाचा त्रास

ट्रेनमध्ये येणाऱ्या विक्रेत्यांकडून बिर्याणी खाल्ल्याने विषबाधा झाल्याचे निष्पण्ण झाले आहे.

Photo Credit- Pixabay

Nagpur Food Poisoning : नागपूरमध्ये रेल्वे प्रवासादरम्यान अंडा बिर्याणी (Egg Biryani) खालल्यामुळे ४० पेक्षा अधिक प्रवाशांना विषबाधा (Food Poisoning)झाल्याचा प्रकार समोर आला आहे. यशवंतपूर एक्सप्रेस (Yashvantpur Express) ट्रेनमध्ये ही घटना घडली. विषबाधा झालेल्या प्रवाशांवर सध्या वेगवेगळ्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सध्या सर्वांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे. यशवंतपूरहून गोरखपूरला जाणारी 22534 एक्स्प्रेस मधील प्रवाशांनी अंडा बिर्याणी खाल्ली होती. या प्रवाशांनी लोकांनी ट्रेनमध्ये येणाऱ्या विक्रेत्यांकडून बिर्याणी आणि अंडा करी विकत घेऊन खाल्ली होती. (हेही वाचा :Food Poisoning: मुंबई विद्यापीठात दूषित पाणी पुरवठा; 40 पेक्षा अधिक विद्यार्थिनींना उलटी, डोकेदुखीचा आजार)

बिर्याणी आणि अंडा करी खाल्यानंतर त्यांना पोटदुखी, उलट्या, जुलाबाचा त्रास जाणवू लागला. वेगवेगळ्या डब्यात बसलेल्या प्रवाशांना एकाचवेळी त्रास जाणवू लागल्याने एकच खळबळ उडाली. त्यानंतर त्यांना जेवणातून विषबाधा झाल्याचे समोर आले आहे.या घटनेचे गांभीर्य ओळखून कानपूर रेल्वे स्थानकावर डॉक्टरांचे पथक ट्रेनमध्ये चढले. ज्यानंतर सर्व प्रवाशांवर उपचार सुरू करण्यात आले. रेल्वे प्रशासन, रेल्वे प्रोटेक्शन फोर्स आणि डॉक्टरांच्या टीमच्या मदतीने आजारी प्रवाशांवर योग्य उपचार करून त्यांना घरी पाठवण्यात आले आहे. सध्या या प्रवाशांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे.

दरम्यान, या प्रकारानंतर ही बिर्याणी बनवताना स्वच्छतेची काळजी घेतली होती का? ती कशी बनवली गेली? कधी बनवली होती? असे अनेक प्रश्न सर्व प्रवाशआंकडून विचारण्यात येत आहेत.