नागपूर जिल्ह्यातील विधानसभा मतदार संघ: नागपूर दक्षिण-पश्चिम ते नागपूर मध्य चे उमेदवार, महत्त्वाच्या लढती आणि निकाल घ्या जाणून
त्याबरोबर नागपूरचे खासदार नितीन गडकरी यांना केंद्रात महत्त्वाची खाती मिळाली. त्यामुळे यावर्षी संपुर्ण ताकदीनिशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुन्हा एकदा रिंगणात उतरले आहे.
विदर्भातलं सगळ्यात मोठं शहर नागपूर (Nagpur) ही राज्याची उपराजधानी आहे. त्यामुळे साहजिकच विदर्भाला राजकीयदृष्ट्या महत्व आहे. त्याला कारणही तसेच आहे. काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणा-या विदर्भात काँग्रेसमधील अंतर्गत संघर्षाचा फायदा भाजप आणि शिवसेनेने येथे शिरकाव केला आणि येथील राजकारणाची समीकरणं बदलून टाकली. त्याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे 2014 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपचे उमेदवार देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचा भरघोस मतांनी विजय झाला इतकेच नव्हे तर तर मुख्यमंत्रीपदावर विराजमानही झाले. विधानसभा निवडणुकीत देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात महाराष्ट्राचं सरकार स्थापन झालं. त्याबरोबर नागपूरचे खासदार नितीन गडकरी यांना केंद्रात महत्त्वाची खाती मिळाली. त्यामुळे यावर्षी संपुर्ण ताकदीनिशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुन्हा एकदा रिंगणात उतरले आहे.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 2014 च्या लोकसभा निवडणुकीत नागपूर दक्षिण-पश्चिम (Nagpur South West Assembly Constituency) मतदारसंघातून निवडून आले होते. यंदाही ते याच मतदारसंघातून निवडणुकीसाठी उभे राहिले आहेत. मात्र यावेळी त्यांच्याविरुद्ध 2014 साली काटोल मतदारसंघातून निवडून आलेले काँग्रेसचे डॉ. आशिष देशमुख रिंगणात उतरले आहेत. आशिष देशमुख यांनी 2 ऑक्टोबर 2018 रोजी आमदारकीचा राजीनामा दिला. तेव्हापासून काटोलची जागा रिक्त होती. मात्र आता ते नागपूर दक्षिण-पश्चिम मतदारसंघातून लढणार असून फडणवीस विरुद्ध देशमुख हे बिग फाईट असल्याचे बोलले जात आहे.
त्याचबरोबर नागपूर उत्तर विधानसभा मतदारसंघात (Nagpur North Assembly Constituency) 1999 ते 2014 पर्यंत काँग्रेसचेच वर्चस्व राहिले आहे. मात्र 2014 साली भाजपचे डॉ. मिलिंद माने काँग्रेसची सत्ता मोडीत काढीत भरघोस मतांनी विजय मिळवला होता. 2019 च्या निवडणुकीत भाजपच्या डॉ.मिलिंद माने विरुद्ध काँग्रेसचे नितीन राऊत रिंगणात उतरले आहेत.
तसेच नागपूर मध्य विधानसभा मतदारसंघात (Nagpur Central Assembly Constituency) 2009 पर्यंत काँग्रेसची सत्ता होती. मात्र 2009 नंतर या मतदारसंघात भाजपची सत्ता आली. 2009 पासून सलग 2 वेळा भाजपचे विकास कुंभारे या मतदारसंघातून निवडून आले. ही परंपरा कायम ठेवत यंदाही ते बाजी मारणार की काँग्रेसचे हृषिकेश शेळके ही परंपरा मोडणार हे येत्या 24 ऑक्टोबरला कळेल. नागपूर: मतदानाचा हक्क बजवा आणि पेंच मध्ये MTDC रिसॉर्ट, हॉटेल्समध्ये 25 टक्के सूट मिळवा!
नागपूर पश्चिम विधानसभा मतदारसंघ (Nagpur West Assembly Constituency) हा सर्वात स्वच्छ मतदारसंघ आहे. 1990 पासून या मतदारसंघात भाजपची सत्ता आहे. 2009 पासून 2014 पर्यंत सलग दोन वेळा निवडून आलेले भाजपचे सुधाकर देशमुख निवडून आले असून यावर्षी ही ते रिंगणात उतरले आहेत. त्यांच्याविरुद्ध काँग्रेसचे विकास ठाकरे उभे राहिले आहेत.
नागपूर पूर्व विधानसभा (Nagpur East Assembly Constituency) मतदार संघाला काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जातो. 2009 आणि 2014 ची विधानसभा निवडणूक वगळता या मतदारसंघात आतापर्यंत सर्व निवडणूका काँग्रेसनेच जिंकल्या आहेत. मात्र 2009 पासून सलग 2 वेळा काँग्रेस पक्षामधून भाजपात आलेले कृष्णा खोपडे विजयी झाले. यंदा त्यांच्याविरुद्ध काँग्रेसने पुरुषोत्तम हजारे यांना रिंगणात उतरवले आहेत.
नागपूर दक्षिण मतदारसंघात (Nagpur South Assembly Constituency) भाजपचे सुधाकर कोहळे हे विद्यमान आमदार आहेत. मात्र यंदा भाजप पक्षाकडून मोहन माटे उभे राहिले असून त्यांच्याविरुद्ध काँग्रेसचे पुरुषोत्तम हजारे रिंगणात उतरले आहेत.
थोडक्यात नागपूर दक्षिण-पश्चिम मतदारसंघापासून नागपूर पूर्व मध्ये बिग फाइट आणि अटीतटीची लढत पाहायला मिळणार आहे. 2019 च्या मुख्यमंत्री पदाचा मान देवेंद्र फडणवीस पटकावणार की काँग्रेस पक्षाचा उमेदवार बाजी मारणार हे लवकरच कळेल.