Nagpur Dengue: नागपुरात 15 दिवसांत डेंग्यूचे 1245 संशयित रुग्ण आढळले, आरोग्य विभागाचा अलर्ट

गेल्या 15 दिवसांत 59 डेंग्यूच्या रुग्णांची नोंद झाली असून 1245 संशयित रुग्ण आढळून आले आहेत.

Dengue | Image Used For Representational purpose Only (Photo Credits: Pixabay.com)

नागपूरमध्ये (Nagpur) यंदा डेंग्यूचा कहर केला असून 15 दिवसांत शहरात डेंग्यूचे 59 रुग्णांची नोंद झाली आहे. दिवसांतील संशयित रुग्णांची संख्या 1245 इतकी आहे. डेंग्यूची साथ मोठ्या प्रमाणावर आली असून आरोग्य विभागाने अलर्ट दिला आहे. नागपुरमध्ये डेंग्यूची (Nagpur Dengue) साथ दिवसेंदिवस वाढताना दिसत असून रोज सरासरी डेंग्यूचे चार रुग्ण सापडत आहेत. त्यामुळेच नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे.

नागपुरमध्ये डेंग्यूच्या साथीने नागरिकांची चिंता वाढली आहे. गेल्या 15 दिवसांत 59 डेंग्यूच्या रुग्णांची नोंद झाली असून 1245 संशयित रुग्ण आढळून आले आहेत. रोगाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे नागरिकांना काळजी घेण्याचे तसेच गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळण्याचे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे.

नागपूर शहराप्रमाणेच राज्यातील इतर शहरातही डेंग्यूने हात पाय पसरायला सुरुवात केली आहे. छत्रपती संभाजीनगरमध्येही डेंग्यूच्या साथीने डोके वर काढले आहे. छत्रपती संभाजीनगर शहरात दोन आठवड्यात डेंग्यूचे तब्बल 59 संशयित तर 12 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. खाजगी रुग्णालयांमध्ये मोठ्या संख्येने रुग्ण उपचार घेत आहेत. पावसाळा सुरू झाल्यापासून शहरात एकदाही मोठा पाऊस झाला नाही. त्यामुळे डासांचे प्रमाण झपाट्याने वाढू लागले आहेत.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif