Nagpur Crime: धक्कादायक! मुलीला घरात कोंडून कुटुंब 5 ते 6 दिवस परगावी, शेजाऱ्यांनी ग्रील तोडून केली सुटका
पोलिसांना संशय आहे की, ही मुलगी घरकामासाठी विकत आणली असावी. मात्र, काही कारणामुळे परगावी जावे लागल्याने हे कुटुंब तिला घरातच कोंडून निघून गेले असावेत असा संशय आहे. पोलिस येण्यापूर्वी शेजाऱ्यांनी मुलीला विश्वासात घेऊन केलेल्या चौकशीमध्ये तिला घरकामासाठी विकत अणल्याची माहिती आहे
नागपूर (Nagpur Crime) शहरातून एक धक्कादायक घटना पुढे येत आहे. शहरातील एका घरातून शेजाऱ्यांनी ग्रील फाकवून एका 8 ते 10 वर्षीय मुलीची सुटका केली आहे. या घटनेचे गांभीर्य वाढवणारा प्रकार म्हणजे या मुलीला घरात कोंडून कुटुंबीय 5 ते 6 दिवसांसाठी चक्क परगावी गेले होते. घरात एकटे वाटू लवागल्याने आणि घाबरल्याने मुलीने रडण्यास सुरुवात केली. ज्याचा आवाज ऐकून शेजारचे लोक मदतीला धावून आले. त्यांनी तिला ग्रीलमधून बाहेर काढले. हुडकेश्वर पोलीस स्टेशन हद्दीतील बेसा-पिपळा रोडवरील 'अथर्व नगरी' नावाने असलेल्या उच्चभ्रू वस्तीत हा प्रकार घडल्याने खळबळ उडाली आहे. पोलिसांनी मुलीला ताब्यात घेऊन चौकशी सुरु केली आहे.
नागपूर पोलिसांना संशय आहे की, ही मुलगी घरकामासाठी विकत आणली असावी. मात्र, काही कारणामुळे परगावी जावे लागल्याने हे कुटुंब तिला घरातच कोंडून निघून गेले असावेत असा संशय आहे. पोलिस येण्यापूर्वी शेजाऱ्यांनी मुलीला विश्वासात घेऊन केलेल्या चौकशीमध्ये तिला घरकामासाठी विकत अणल्याची माहिती आहे. दरम्यान, ही मुलगी नेमकी कुठली आहे. याबाबत माहिती मिळू शकली नाही. पोलिस त्याबाबत तपास करत आहे. पीडित मुलीच्या शरीरावर सिगारेट आणि काही गरम वस्तूने चटके दिल्याचे डागही आढळून आल्याची चर्चा आहे.
पाठिमागील काही काळापासून नागपूर शहरामध्ये मोठ्या प्रमाणावर गुन्हेगारी बोकाळली आहे. दररोज कुठे ना कुठे गुन्हेगारीच्या घटना घडतात. कधी हत्या, कधी हाफ मर्डर तर कधी घरफोडी आणि किरकोळ कारणावरुन टोकाची भांडणे. गेल्याच आठवड्यात 20 ऑगस्ट रोजी नागपूरमध्ये अवघ्या 24 तासांमध्ये वेगवेगळ्या घटनांमध्ये तिघाची हत्या झाली आहे. जीवघेण्या हल्ल्याच्या दोन घटना घडल्या. त्यातील दोघे गंभीर जखमी आहेत. त्यामुळे नागपूर शहरात चाललंय तरी काय, असा प्रश्न उपस्थित केला जातो आहे.
(The above story first appeared on LatestLY on Aug 31, 2023 07:52 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

