Nagpur Crime: मित्राला भेटायला गेलेल्य भाजप महिला पदाधिकाऱ्याची हत्या, मृतदेह नदीत फेकला

सना खान 1 ऑगस्ट रोजी मध्यप्रदेशातील जबलपूर येथील मित्र अमित उर्फ पप्पू साहू याला नागपूरवरुन भेटायला गेली होती.

Crime | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

भाजपची नागपूर शहरातील (Nagpur City) महिला पदाधिकारी सना खान (Sana khan) हिची मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh) जबलपूर (Jabalpur) शहरात हत्या झाल्याचे आता निष्पन्न झाले आहे. सना खान हत्या प्रकरणात पोलिसांनी मुख्य आरोपी अमित साहू याचा नोकर जितेंद्र गौड याला अटक केली आहे. त्याने सनाचा खून करून मृतदेह नदीत फेकल्याची कबुली दिली आहे. नागपूर पोलिसांनी अमित साहुच्या नोकराला अटक केली आहे. दरम्यान या घटनेने नागपूर शहरात मोठी खळबळ उडाली आहे.  (हेही वाचा - Hingoli Accident: हिंगोलीत स्कूल बसला मोठा अपघात; 7 ते 8 विद्यार्थी गंभीर जखमी)

सना खान 1 ऑगस्ट रोजी मध्यप्रदेशातील जबलपूर येथील मित्र अमित उर्फ पप्पू साहू याला नागपूरवरुन भेटायला गेली होती. अमित हा सना खानचा बिझनेस पार्टनर असल्याची माहिती आहे. जबलपूरमध्ये गेल्यानंतर सना अमितच्या घरी मुक्कामी थांबणार होती. मात्र 2 ऑगस्टपासून सना खानचा फोन लागत नसल्याने तिझ्या आईने नागपूर पोलिसांत बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवली. मानकापूर पोलिसांचे पथक सना खानचा शोध घेण्यासाठी जबलपूरला गेलं. पोलिसांनी अमित साहू याचा शोध घेतला.

पोलीस आपला शोध घेत जबलपूरला आल्याची माहिती मिळताच अमित साहू फरार झाला. नंतर याच्या नोकरांनीही तेथून पळ काढला होता. शेवटी पोलिसांनी अमितचा नोकर जीतेंद्र गौड याला अटक केली. त्याने अमितच्या कारच्या डिक्कीत रक्त सांडलेले होते. यानंतर रक्ताने माखेलेली कारची डिक्की स्वच्छ केल्याची कबुली नोकराने दिली तसेच सनाचा मृतदेह नदित फेकल्याचे देखील सांगितले. सना खान हत्याकांडाचे प्रकरण जबलपूर पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आले आहे.