Nagpur BDSM Sex Death Case: पॉर्न फिल्म बघून सेक्स करण्याचा नादात मृत्यू झालेल्या तरूणाच्या प्रेयसीला जामीन मंजूर
याप्रकरणी मृत तरुणाच्या कुटुंबीयांच्या तक्रारीवरून अटक करण्यात आलेल्या त्याच्या प्रेयसीची जिल्हा व सत्र न्यायालयाने जामिनावर सुटका केली आहे.
नागपूर (Nagpur) येथे मोबाईलवर पॉर्न फिल्म (Porn Videos) पाहून वेगवेगळ्या प्रकारे शारिरिक संबंध प्रस्थापित करण्याचा नादात एका तरूणाचा गळ्याला फास लागून मृत्यू झाला होता. याप्रकरणी मृत तरुणाच्या कुटुंबीयांच्या तक्रारीवरून अटक करण्यात आलेल्या त्याच्या प्रेयसीची जिल्हा व सत्र न्यायालयाने जामिनावर सुटका केली आहे. मृत व्यक्ती हा विवाहित असून तो आपल्या प्रेयसीसोबत खापरखेडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या एका लॉजवर गेला असताना ही घटना घडली होती. त्यावेळी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली होती. मात्र, 'प्रेयसीनेच माझ्या मुलाचा गळा आवळून खून केला', असा आरोप करत तरूणाच्या नातेवाईकांनी पोलिसांत तक्रार दिली. त्यानंतर या तरूणीवर गुन्हा दाखल करण्यात आला होता.
मृत व्यक्ती आणि त्याच्या प्रेयसीने 7 जानेवारीला खापरखेडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दहेगाव परिसरात असलेल्या महाराजा लॉजवरील एक खोली बुक केली होती. त्यावेळी पॉर्न फिल्म पाहून त्याने आपल्या प्रेयसीसोबत वेगवेगळ्या प्रकारे शारिरिक सबंध करण्यासाठी त्याने दोरीचा उपयोग केला. दरम्यान, तरूणाने खुर्चीवर हात आणि पाय दोरीने बांधले पुढे तीच दोरी त्याच्या गळ्याच्या भोवती सुद्धा गुंडाळली. मात्र, काहीवेळाने तो खुर्चीसह खाली कोसळला आणि दुर्दैवाने त्याच्या गळ्याभोवती असलेला दोर आवळला गेला. ज्यामुळे त्याचा मृत्यू झाला, अशी माहिती आरोपी तरूणीने दिली होती. हे देखील वाचा- पुणे: Sharjeel Usmani च्या एल्गार परिषदेतील प्रक्षोभक विधानानंतर स्वारगेट पोलिस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल
दरम्यान, ज्या दिवशी ही घटना घडली, तेव्हा मृत व्यक्ती आपल्या छोट्या मुलाला घेऊ दवाखान्यात जाणार होता. मात्र, त्यावेळी आरोपी तरूणीचा त्याला फोन आला. त्यानंतर कामानिमित्त सावनेरला जात असल्याचे घरच्यांना सांगत तो घराबाहेर पडला. परंतु, संध्याकाळ झाली तरी, तो घरी परतलाच नाही. यामुळे त्याच्या कुटुंबियांनी फोनद्वारे त्याच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. परंतु, समोरून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. त्यानंतर रात्री 10 वाजताच्या सुमारास त्याचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली. तसेच संबंधित तरूणीने माझ्या मुलाचा गळा आवळून खून केला आहे, अशी तक्रार वडिलांनी पोलिसांत नोंदवली आहे.
तरूणाच्या वडिलांनी दाखल केलेल्या तक्रारीनंतर त्या तरूणीला अटक करण्यात आली होती. मात्र, आज दोन्ही पक्षाचा युक्तिवाद ऐकून नागपूर सत्र न्यायालयाने आरोपी तरूणीला जामीन मंजूर केला आहे. महत्वाचे म्हणजे, या प्रकरणाची अंतिम सुनावणी अद्याप बाकी आहे. या संदर्भात महाराष्ट्र टाईम्सने वृत्त दिले आहे.