नागपूर: देवेंद्र फडणवीस यांच्या विरुद्ध RTI कार्यकर्त्याची ED कडे तक्रार, पदाचा गैरफायदा घेत AXIS बॅंकेला फायदा करून दिल्याचा आरोप
नागपूर मध्ये स्थित एक खाजगी बँकेला अवैध पद्धतींनी आपल्या पदाचा वापर केल्याचा आरोप लावत या तक्रारदाराने ईडी कडे धाव घेतली
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devednra Fadnavis) यांच्या विरुद्ध नागपूर (Nagpur) मधील मोहनीश जबलपूरे (Mohnish Jabalpure) या आरटीआय कार्यकर्त्याने (RTI-Activist) सक्तवसुली संचालनालयाकडे (ED) लेखी तक्रार नोंदवली आहे. नागपूर मध्ये स्थित एक खाजगी बँकेला अवैध पद्धतींनी आपल्या पदाचा वापर केल्याचा आरोप लावत या तक्रारदाराने ईडी कडे धाव घेतली. या खाजगी बँकेत फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) या एका वरिष्ठ पदावर कार्यरत आहेत त्यामुळे या बँकेचा व्यवसाय वाढवण्यासाठी त्यांना मुख्यमंत्र्यानी त्यांना सूट दिली अशी तक्रार आहे. याप्रकरणी ईडी व सीबीआय (CBI) ने फडणवीस यांची रीतसर चौकशी करावी अशी मागणी देखील करण्यात आली आहे.
IANS ट्विट
प्राप्त माहितीनुसार,मुख्यमंत्री फडणवीस यांनी महाराष्ट्र्र राज्य पोलिस कर्मचाऱ्यांचे बँक अकाउंट्स हे स्टेट बँक ऑफ इंडिया मधून AXIS या खाजगी बँकेत हस्तांतरित करण्यात मदत केल्याचा आरोप जबलपूरे यांनी केला आहे.याच बँकेत अमृता फडणवीस या एका उच्च पदावर आहेत. याप्रकरणी स्टेट बँकेने अधिकृत अहवाल देऊन किती अकाउंट्स यापाद्धतीने हस्तांतरित करण्यात आले हे सांगावे अशी मागणी देखील त्यांनी केली आहे. यापूर्वी 7 ऑगस्ट रोजी मुंबई उच्च नायलायच्या नागपूर खंडपीठात देखील जबलपुरे यांनी तक्रार केली होती.
दरम्यान, 11 मे 2019 रोजी राज्य सरकार पोलीस मुख्यलयाने एका परिपत्रकात दिलेल्या माहितीनुसार, लाखो पोलीस कर्मचाऱ्यांचे अकाउंट्स खाजगी बँकेत उघडण्यात आले होते, यामुळे राष्ट्रीय बँकांचे मोठे नुकसान झाल्याचा आरोप जबलपूरे यांनी केला आहे. या प्रकरणी 29 ऑगस्ट रोजी नागपूर खंडपीठात पहिली सुनावणी होणार आहे.