Nagpur: पतंगाच्या मांजाने घेतला आणखी एकाचा जीव; नागपूर येथे गेल्या 10 दिवसांत तिसरा बळी

मात्र, पतंग उडविण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या मांजामुळे एका दुचाकीस्वराचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. ही घटना नागपूरच्या (Nagpur) मंगळवारी जाटतरोडी परिसरात घडली आहे.

Image Used for Representational Purpose Only | (Photo Credits: Facebook)

मकरसंक्रांती सणाच्या पार्श्वभूमीवर देशभर पतंग उडविण्याची धूम सुरू आहे. मात्र, पतंग उडविण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या मांजामुळे एका दुचाकीस्वराचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. ही घटना नागपूरच्या (Nagpur) मंगळवारी जाटतरोडी परिसरात घडली आहे. या घटनेनंतर आजूबाजूच्या परिसरात एकच खळबळ माजली आहे. नागपूर येथे गेल्या दिवसांत पतंगाच्या मांजामुळे गेलेला हा तिसरा बळी आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मृत तरूण हा आपल्या वडिलांसोबत तहशीलमध्ये गेला होता. त्यानंतर घरी परत येत असताना त्याच्या गळ्याला मांजा गुंडाळला गेला. ज्यामुळे तो गंभीर जखमी झाला. त्यानंतर ताबडतोब त्याला जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे समजत आहे.

प्रणय प्रकार ठाकरे असे मृत तरूणाचे नाव असून तो ज्ञानेश्वरनगर, मानेवाडा रोड येथील रहिवाशी आहे. प्रणय हा मंगळवारी दुपारी त्याच्या वडिलांसोबत तहशीलमध्ये गेला होता. तहशीलमधील काम आटपून हे दोघेही घराकडे निघाले. मात्र, सायंकाळी जाटतरोडी चौकातून जात असताना त्याच्या गळ्याला नायलॉनचा मांजा गुंडाळला गेला. त्यानंतर त्याने आपली दुचाकी थांबवली आणि गळ्याभोवती गुंडाळेला मांजा काढू लागला. मात्र, त्याचवेळी बाजुला जाणाऱ्या वाहनाला तोच मांजा अडकला. त्यामुळे प्रणयच्या गळ्याला घट्ट मांजा आवळला आणि त्याचा गळा कापला गेला. त्यानंतर प्रणयच्या गळ्यातून रक्ताच्या चिरकांड्या निघायला लागल्या. प्रणयला जखमी अवस्थेत जवळील रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. हे देखील वाचा-धक्कादायक! धावत्या खासगी ट्रॅव्हल्समध्ये बस क्लिनरकडून 21 वर्षीय तरुणीवर बलात्कार, वाशिममधील घटना

एएनआयचे ट्विट-

नायलॉन मांजावर कायद्याने बंदी आहे. मात्र, त्यानंतरही नागपूरसह इतरत्र सर्रास या मांजाची विक्री होत आहे. याशिवाय काही बेजबाबदार व्यक्ती रस्त्याकडेला किंवा गर्दीच्या ठिकाणी पतंग उडवत असताना दिसत. ज्यामुळे एखाद्या व्यक्तीच्या गळ्याला मांजा अडकून त्याला गंभीर इजा किंवा मृत्यू होण्याची शक्यता अधिक असते. नागपूर येथे घडलेल्या घटनेनंतर प्रशासन काय निर्णय घेतात? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif