मुंबई काँग्रेसची नवीन कार्यकारिणी जाहीर; बॉलिवूड अभिनेत्री आणि काँग्रेस नेत्या Nagma Morarji यांच्यावर मोठी जबाबदारी

आगामी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर (Brihanmumbai Municipal Corporation Election 2022) मुंबई काँग्रेसची (Mumbai Congress) नवीन कार्यकारणी जाहीर (Congress Announces New Executive Committee) झाली आहे.

Nagma Morarji (Photo Credit: Twitter)

आगामी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर (Brihanmumbai Municipal Corporation Election 2022) मुंबई काँग्रेसची (Mumbai Congress) नवीन कार्यकारणी जाहीर (Congress Announces New Executive Committee) झाली आहे. या कार्यकारिणीत सहा ज्येष्ठ उपाध्यक्ष, 15 उपाध्यक्ष, 43 महासचिव, 76 सचिव आणि 30 कार्यकारी सदस्य आहेत. या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्षातील सर्वच गटांना काही ना काही मिळेल, याची दक्षता या निमित्ताने घेतली गेल्याचे चित्र आहे. यातच बॉलिवूड अभिनेत्री आणि काँग्रेस नेत्या नगमा मोरारजी (Nagma Morarji) यांच्या मोठी जबाबदारी सोपण्यात आली आहे. मुंबई काँग्रेसच्या उपाध्यक्षपदी नगमा यांची निवडणूक करण्यात आली आहे.

नगमा यांना हैदराबाद मतदारसंघातून निवडणूकीत उतरवण्यासाठी भाजप तयारीत होती. पण त्यांनी काँग्रेसमधून राजकारणात प्रवेश केला. त्यांनी उत्तर प्रदेशातील मेरठ मतदारसंघातून 2014 मध्ये लोकसभा निवडणूक लढवली होती. मात्र, या निवडणूकीत त्यांचा पराभव झाला होता. एवढेच नव्हेतर त्यांचा डिपॉझिटही जप्त झाले होते. नगमा या गेल्या 17 वर्षांपासून राजकारणात सक्रीय आहेत. 2019 मध्ये लोकसभा निवडणुकांसाठी काँग्रेसच्या 40 स्टार प्रचारकांमध्येही नगमा यांचा समावेश होता. हे देखील वाचा- Sachin Vaze Case: सचीन वाझे प्रकरणी मुख्यमंत्री वकिली का करतात? भाजप आमदार नितेश राणे यांची शिवसेना नेत्यांवर गंभीर आरोपट

ट्वीट-

नगमा यांनी बॉलिवूडसह दाक्षिणात्या चित्रपटांमध्येही काम केले आहे. त्यांनी 1990 साली दबंग सलमान यांच्यासोबत बागी चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आहे. बॉलिवूडमधील सुहाग, बागी, लाल बादशाह, कुवारा, अब तुम्हारे हवाले वतन साथियों अशा काही हिंदी सिनेमात त्या झळकल्या आहेत. याशिवाय, तेलुगू, तमिळ, भोजपुरी, मल्ल्याळम, पंजाबी, कन्नड, बंगाली अशा बऱ्याच भाषांमधील चित्रपटात त्यांनी काम केले आहे.