My Preferred CIDCO Home Scheme: ‘माझे पसंतीचे सिडकोचे घर’ योजनेमधील 26 हजार घरांसाठी अर्जाला 11 डिसेंबर पर्यंत मुदतवाढ

cidcohomes.com या वेबसाईट वर सिडकोच्या घरांसाठी अर्ज करता येणार आहे.

My Preferred CIDCO Home Scheme: ‘माझे पसंतीचे सिडकोचे घर’ योजनेमधील 26 हजार घरांसाठी अर्जाला 11 डिसेंबर पर्यंत मुदतवाढ
Cidco | (File Image)

‘माझे पसंतीचे सिडकोचे घर’ (My Preferred CIDCO Home Scheme)  मध्ये सिडको कडून 26 हजार घरांसाठी सोडत जाहीर झाली आहे. पण आता या योजनेतील घरांसाठी अर्ज करण्ययासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. सिडको महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी 11 डिसेंबरपर्यंत ही मुदतवाढ दिल्याचं सांगण्यात आले आहे. आतापर्यंत यासाठी 88 हजारांपेक्षा अधिक अर्ज आले आहेत. त्यामुळे अर्जाची संख्या सव्वालाखापर्यंत पोहचेल असा अंदाज आहे.

दसर्‍या दिवशी नवी मुंबई मध्ये वाशी, खारघर, मानसरोवर रेल्वेस्थानक, खांदेश्वर रेल्वेस्थानक आणि तळोजा या परिसरातील 26 हजार घरांसाठी सिडको मंडळाने अर्जाची नोंदणी करण्यास सुरूवात केली आहे. सिडको कडून या घरांसाठी किंमती सांगण्यात आलेल्या नाहीत. My Preferred CIDCO Home Scheme: ‘माझे पसंतीचे सिडकोचे घर’ योजनेमध्ये 26,502 घरांसाठी रजिस्ट्रेशन cidcohomes.com वर सुरू; पहा पात्रता निकष, अर्ज करण्याची प्रक्रिया .

पहा कशी आहे ऑनलाईन रजिस्ट्रेशनची प्रक्रिया

आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक आणि अल्प उत्पन्न गटासाठी या उत्पन्न गटातील नागरिक अर्ज करू शकणार आहेत. यासाठी 6 लाखापेक्षा अधिक उत्पन्न असणारे एलआयजी श्रेणीत अर्ज करू शकतात. cidcohomes.com या वेबसाईट वर अर्ज करता येणार आहे.

(The above story first appeared on LatestLY on Nov 14, 2024 03:13 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).