Sambhajinagar Shocker! औरंगाबादमध्ये हिजाब परिधान केलेल्या मुस्लिम महिलेचा 3 तरुणांकडून छळ; Watch Video

ही घटना सोमवारी मकई गेट परिसरात घडली. या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

woman wearing hijab harassed by 3 youths (PC - Twitter)

Aurangabad Shocker: औरंगाबाद (Aurangabad) म्हणजेच संभाजीनगर (Sambhajinagar) मध्ये अत्यंत धक्कादायक प्रकार समोर आला आहे. औरंगाबादमध्ये हिजाब (Hijab) परिधान केलेल्या मुस्लिम महिलेचा छळ केल्याप्रकरणी तीन जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले. ही घटना सोमवारी मकई गेट परिसरात घडली. या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पोलिसांनी बेगमपुरा पोलिस ठाण्यात तक्रार नोंदविण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.

या व्हिडिओमध्ये दिसत आहे की, तरुणांच्या एका गटाने महिलेचा मोबाईल हिसकावला. त्यानंतर ही महिला या तरुणांना आपला मोबाईल परत करण्याची विनंती करताना दिसत आहे. ही महिला एका हिंदू पुरुषासोबत फिरत असल्याचा संशय या तरुणांना आला आणि त्यांनी तिचा छळ केला. ही महिला औरंगाबादमधील प्रसिद्ध बीबी का मकबरा येथे भेट देण्यासाठी आली असताना ही घटना घडली. यावेळी तरुणांनी या मुस्लिम मुलीला शिवीगाळही केली. (हेही वाचा - Pune-Mumbai Highway Accident: पुणे-मुंबई एक्स्प्रेसवर विचित्र अपघात; 7 वाहने एकमेकांवर आदळली, चार जण जखमी, Watch Video)

पोलिसांनी व्हिडिओद्वारे महिलेची ओळख पटवली आणि तिला तक्रार नोंदवण्यास सांगितले. मात्र, तरुणीने तक्रार देण्यास नकार दिला. त्यामुळे पोलिसांनी स्वत:हून तक्रार नोंदवण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. पोलीस उपायुक्त दीपक गिर्हे यांनी सांगितले की, पोलीस कारवाई करत असून या घटनेत सहभागी असलेल्या तिघांना ताब्यात घेण्यात आलं आहे.

ही घटना आपल्या समुदायांमध्ये सर्वसमावेशकता आणि आदराची संस्कृती वाढवण्याचे महत्त्व अधोरेखित करते. प्रत्येकाला त्यांचा धर्म, वंश किंवा लिंग यावर आधारित छळ किंवा भेदभाव न करता त्यांचे जीवन मुक्तपणे जगण्याचा अधिकार आहे. विविधतेचा आदर करणे आणि प्रत्येकाशी सन्मानाने व दयाळूपणे वागणे तसेच याबाबत जागरूकता निर्माण करणे आवश्यक असल्याचं पोलिस अधिकाऱ्याने यावेळी सांगितलं.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif