मुरलीधर मोहोळ मुख्यमंत्री होणार? पहा या चर्चांदरम्यान त्यांनी केलेली सोशल मीडीया पोस्ट
भाजपाचे खासदार मुरलीधर मोहोळ यांनी राज्यमंत्री पद मिळवल्यानंतर आता त्यांना त्यांचं नाव मुख्यमंत्रीपदी आले आहे पण मुरलीधर मोहोळांनी या चर्चांना पूर्णविराम दिला आहे.
महाराष्ट्र विधानसभा निवडणूकीच्या निकालानंतर आता राज्यात मुख्यमंत्री पदी कोण विराजमान होणार? याचा पेच अद्याप सुटलेला नाही. महायुती मध्ये शिवसेना, भाजपा आणि एनसीपी पक्षाचं सरकार सत्तेमध्ये येणार आहे पण त्यांच्यामध्ये आता सत्तावाटपाची चर्चा होत असताना मुख्यमंत्री पदी भाजपाच्या मुरलीधर मोहोळ यांचेही नाव आले आहे. मुरलीधर मोहोळ (Murlidhar Mohol) हे सध्या लोकसभा खासदार आणि राज्यमंत्री आहे. भाजपा पक्षश्रेष्ठी राज्यातला निर्णय घेणार असल्याने त्याकडे लक्ष लागले आहे. दोन दिवसांपूर्वीच दिल्लीमध्ये अमित शाह यांच्या भेटीला एकनाथ शिंदे, अजित पवार, देवेंद्र फडणवीस पोहचले होते. नक्की वाचा: Maharashtra Govt Formation: महाराष्ट्राच्या नव्या मंत्रिमंडळात भाजपला 22, शिंदे सेनेला 12, अजित पवारांच्या राष्ट्रवादीला 10 मंत्रीपदे; मुख्यमंत्रीपदाबाबत अजूनही सस्पेन्स- Report .
मुरलीधर मोहोळ यांची पोस्ट
भाजपाचे खासदार मुरलीधर मोहोळ यांनी राज्यमंत्री पद मिळवल्यानंतर आता त्यांना त्यांचं नाव मुख्यमंत्रीपदी आले आहे पण मुरलीधर मोहोळांनी या चर्चांना पूर्णविराम दिला आहे. x वर पोस्ट करताना त्यांनी 'समाजमाध्यमांमधून मुख्यमंत्रीपदासाठी होणारी चर्चा निर्थरक आणि कपोलकल्पित आहे.' असं म्हटलं आहे. तसेच भारतीय जनता पार्टीत पक्षशिस्त आणि पार्टीचा निर्णय सर्वोच्च असतो. असे निर्णय पार्लिमेंटरी बोर्डात एकमतावर घेतले जातात असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
दरम्यान काही दिवसांपूर्वी एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यापदावर अडून बसणार नसल्याचं म्हटलं आहे. त्यानंतर भाजपाकडून विनोद तावडे, देवेंद्र फडणवीस यांंच्या नावाची चर्चा झाली आहे. येत्या 5 डिसेंबरला मुंबई मध्ये आझाद मैदानावर नव्या सरकारचा शपथविधी होण्याचा अंदाज आहे.