पुणे महानगर पालिका महापौर पदी भाजपच्या मुरलीधर मोहोळ यांची निवड; शिवसेनेने केले कॉंग्रेस-एनसीपी साठी मतदान

या महापौरपदाच्या निवडणूकीमध्ये मुरलीधर यांना प्रकाश कदम (Prakash Kadam) यांचे आव्हान होते

Murlidhar Mohol | Photo Credits: Twitter

आज महाराष्ट्रात महत्त्वाच्या महानगर पालिकांमध्ये महापौर पदासाठी निवडणूक पार पडली आहे. पुण्यामध्ये भारतीय जनता पक्षाचे उमेदवार मुरलीधर मोहोळ (Murlidhar Mohol) हे महापौर म्हणून निवडून आले आहेत. या महापौरपदाच्या निवडणूकीमध्ये मुरलीधर यांना प्रकाश कदम (Prakash Kadam) यांचे आव्हान होते. मात्र चांगल्या मतांच्या फरकाने ते निवडून आले आहेत. आज पुण्याच्या महापौरपदाची निवडणूक पार पडली आहे. किशोरी पेडणेकर मुंबईच्या नव्या महापौर; तर सुहास वाडकर उपमहापौर पदी विराजमान.  

महाराष्ट्रात सत्ता संघर्षाच्या पार्श्वभूमीवर भाजपा आणि शिवसेनेमध्ये तणावग्रत संबंध आहेत. त्याचा परिणाम पुण्याच्या महापौर निवडीवर झाला. पुण्यात भाजपाने 166 पैकी 99 नगरसेवकांचा पाठिंबा भाजपाला मिळाला. आरपीआयच्या 5 नगरसेवकांनी देखील भाजपाला पाठिंबा दिला आहे. दरम्यान शिवसेनेच्या नगरसेवकांनी पुण्यात कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी पक्षाच्या उमेदवाराला मतदान केले. तर मनसे तटस्थ होती.

मुरलीधर मोहोळ यांचे ट्वीट 

पुणे महानगर पालिकेमध्ये 166 नगरसेवक आहेत. त्यापैकी 99 भाजपा, 5 आरपीआय मात्र त्यांनी भाजपाच्या निवडणूक चिन्हावर निवडणूक लढवली आहे. तर एनसीपी 41, कॉंग्रेस 9, शिवसेना 10 आणि मनसेचे 2 नगरसेवक आहेत.