Thane Crime: नग्न फोटो दाखवून ब्लॅकमेल करणाऱ्या तरुणाची हत्या, तरुणीवर गुन्हा दाखल

पोलिसांनी या हत्येचा उलगडा केला आहे. एका २० वर्षीय तरुणीला तिचे नग्न फोटो दाखवून ब्लॅकमेल केल्याप्रकरणी तरुणाची हत्या केली.

Representative Image

Thane Crime: महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यात एका २४ वर्षीय मुलाची हत्या करण्यात आली आहे. पोलिसांनी या हत्येचा उलगडा केला आहे. एका २० वर्षीय तरुणीला तिचे नग्न फोटो दाखवून ब्लॅकमेल केल्याप्रकरणी तरुणाची हत्या करण्यात आली. या घटनेनंतर ठाणे शहर हादरले आहे. पोलिसांनी या प्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल केला. (हेही वाचा- बेंगळुरूच्या तीन मोठ्या महाविद्यालयांना ईमेलद्वारे बॉम्बने उडवण्याची धमकी; विद्यार्थ्यांमध्ये पसरली दहशत)

मिळालेल्या माहितीनुसार, सतेश परांजपे असं हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे.  आरोपी तरुणी आणि हत्या झालेल्या तरुणाची काही महिन्यापूर्वीच एका लग्नात ओळख झाली होती. दोघे एकमेकांशी सोशल मीडियाच्या माध्यमातून बोलू लागले. त्यानंतर काही दिवसांने तरुणाने तरुणीला भेटण्यासाठी घरी बोलावून घेतले. त्यावेळीस तरुणाने तिला गुंगीचे औषध दिले. गुंगीचे औषधाने तिला गुंगी आली. त्यानंतर तरुणाने तिचे नग्न फोटो आणि व्हिडिओ काढले. काही दिवसानंतर त्याने तरुणीला ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली. तिचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट करणयाची धमकी दिली.

या घटनेनंतर संतापलेल्या तरुणीने ही माहिती तिच्या दुसऱ्या मित्राला दिली. मयुरेश असं मित्राचे नाव आहे. मयुरेश आणि तरुणी सतेश यांच्या घरी गेले. त्याला फोटो आणि व्हिडिओ डिलीज करण्यासाठी विनंती केली. परंतु त्याने एक ऐकले नाही त्यामुळे त्यांच्याच वाद झाला आणि वादाचे भांडणात रुपांतर झाले. मयुरेश आणि पीडित तरुणीने रागाच्या भरात सतेशची हत्या केली. ठाणे पोलिस ठाण्यात दोघांविरुध्दात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif