धक्कादायक: जास्त पोटगी मिळावी म्हणून आईने केली 3 वर्षाच्या मुलाला नग्न करून अमानुष मारहाण; पतीला व्हिडिओ पाठवला

नवऱ्याकडून जास्त पोटगी मिळावी म्हणून एका आईने आपल्या तीन वर्षाच्या मुलाची अमानुष मारहाण केली आहे. त्याउपर या गोष्टीचा व्हिडीओ तयार करून तिने तो आपल्या नवऱ्याला पाठवला

मुलाला मारणारी निर्दयी आई (Photo Credit : Youtube)

‘आई’ या शब्दाला काळिमा फासणारी गोष्ट नुकतीच घडली आहे. नवऱ्याकडून जास्त पोटगी मिळावी म्हणून एका आईने आपल्या तीन वर्षाच्या मुलाची अमानुष मारहाण केली आहे. त्याउपर या गोष्टीचा व्हिडीओ तयार करून तिने तो आपल्या नवऱ्याला पाठवला. हीना शेख (वय 27)असे या महिलेचे नाव असून, ती मुंब्रा इथे राहणारी आहे. याबाबत नवऱ्याने पोलिसांमध्ये तक्रार केल्यावर काल पोलिसांनी या महिलेले अटक केली आहे.

चार वर्षांपूर्वी फैयाज शेख या इसमाचे लग्न हीना शेख हिच्यासोबत झाले. फैयाज हा रिक्षा क्लीनर आहे तसेच त्याचा भाजीपाला विकण्याचा व्यवसाय आहे. काही कारणास्तव जानेवारी 2018 मध्ये या दोघांचा घटस्फोट झाला. त्यावेळी फैयाजने हीनाला मुलाला वाढवण्यासाठी सहा हजार रुपये देण्याचे कबुल केले होते. त्यानुसार तो दर महिन्याला न चुकता पैसे देत असे. मात्र कधीतरी पैसे देण्यास उशीर झाला तर हीना या 3 वर्षाच्या मुलाला मारहाण करत असे. आता तर तिने हे पैसे वाढवून मिळावे म्हणून मुलाला नग्न करून अमानुष मारहाण केली आणि तो व्हिडिओ नवऱ्याला पाठवला. (हेही वाचा: नातेवाईकांकडून महिलेला विवस्त्र करुन मारहाण; औरंगाबाद येथील घटना)

आताच नाही तर याआधी अनेकवेळा हीनाने पैशाची मागणी करण्यासाठी अशाप्रकारे मुलाला मारहाण केली असल्याचे फैयाज यांनी सांगितले. पोलिसांनी आयपीसीच्या कलम 324 अंतर्गत हीना विरुद्ध गुन्हा नोंदवला आहे. पोलीस सध्या या प्रकरणाची चौकशी करीत आहेत.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement