प्रिन्स चार्ल्स यांचा नातू Archie साठी मुंबईच्या डब्बेवाल्यांनी खरेदी केलं चांदीचं वळं, चैन आणि हनुमानाचं पेंडण, ब्रिटीश काऊंसिलच्या माध्यमातून देणार भेट

मेघन आणि हॅरीच्या मुलाचं नाव Archie Harrison Mountbatten-Windsor ठेवण्यात आलं आहे.

Meghan (Photo Credits: Twitter)

लंडनच्या राजघराण्यात 6 मे दिवशी नव्या चिमुकल्या राजकुमाराचं आगमन झालं आहे. मेगन मार्कल (Meghan Markle) आणि प्रिंस हॅरी (Prince Harry) यांना मुलगा झाल्याच्या आनंदात लंडन सोबत मुंबईत डब्बेवाल्यांनीदेखील आनंद व्यक्त केला आहे. प्रिन्स हॅरीचे वडील प्रिन्स चार्ल्स पुन्हा आजोबा झाल्याच्या आनंदात त्यांचे मुंबईकर मित्र 'मुंबईचे डब्बेवाले' (Mumbai Dabbewala) यांनी खास सोन्याच्या दागिन्यांची खरेदी केली आहे. यामध्ये चांदीचं वळं, पैंजण, चैन, हनुमानाचं पेंडण यांचा समावेश आहे.  मेघन आणि हॅरीच्या मुलाचं नाव  Archie Harrison Mountbatten-Windsor ठेवण्यात आलं आहे.

मुंबईचे डब्बेवाले ही खास भेट मुंबईतील ब्रिटीश काऊंसिल ऑफिसमध्ये देणार आहेत त्यांच्यामार्फत ती राजपुत्रापर्यंत पोहचणार आहे. डब्बेवाल्यांच्या मॅनेजमेंटची ओळख जगभरात पोहचवण्यामध्ये लंडनच्या प्रिन्स चार्ल्स यांचा मोलाचा वाटा आहे. त्यामुळे मागील अनेक वर्षांपासून जपलेले ऋणानुबंध आता तिसर्‍या पिढीच्या माध्यमातूनही जपले जात आहेत.

प्रिन्स हॅरी आणी मेघन यांच्या लग्न सोहळ्यात डबेवाल्यांनी आवर्जुन मराठमोळा आहेर त्यांना पाठवला होता. हॅरी साठी सलवार-कुर्ता फेटा तर मेघनसाठी पैठणीसाडी-चोळी पाठवली होती.