Mumbai News: गुणरत्न सदावर्तेंच्या वाहनाची केली तोडफोड, मराठा क्रांती मोर्चाचे कार्यकर्त्यांना घेतले ताब्यात
या प्रकरणात पोलीसांनी मराठा क्रांतीचे तीन कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आहे.
Mumbai News: मुंबई वकिल गुणरत्न सदावर्ते (Gunratana Sadavarte) यांच्या वाहनाची तोडफोड झाल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणात पोलीसांनी मराठा क्रांतीचे तीन कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आहे. सदावर्तेंच्या गाडीची तोडफोड केल्यानंतर परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. वाहनाची तोडफोड करताना जोरदार घोषणाबाजी केली अशी माहिती मिळाली आहे. भोईवाडा पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले आहे. गुणरत्न सदावर्तें परळ येथील क्रिस्टल टॉवरमध्ये असणाऱ्या घराबाहेर त्यांच्या वाहनाची तोडफोड केली.
पोलिसांना दिलेल्या तक्रारीत त्यांनी धमकीचे फोन येत असल्याचाही दावा केला. पोलिसांना तात्काळ तीन जणांना ताब्यात घेतले आहे. या घटनेअंतर्गत पोलिस पुढील तपास करत आहे. तब्बल तीन गाड्यांची तोडफोड केल्याची माहिती मिळाली आहे. राज्यात मराठा आरक्षणाचा विषय आघाडीवर आहे. वकिल गुणरत्न सदावर्ते आणि त्यांच्या पत्नी जयश्री पाटील या मराठा आरक्षणाविरोधात याचिका दाखल केली होती. याच याचिकेमुळे मराठा आरक्षण रद्द करण्यात आलं होते. तेव्हापासून गुणरत्न सदावर्ते यांच्याबाबत मराठा समाजामध्ये रोष असल्याचं पाहायला मिळत आहे. तर काहींनी याच गोष्टीचा राग ठेवून कार्यकर्त्यांना गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीची तोडफोट केली.
सकाळी काही अज्ञात लोक इमारतीच्या गेट जवळ आले, साडेसहाच्या सुमारास यांना वाहनाची तोडफोड करायला सुरुवात केली. याची माहिती मिळताच, त्यांनी भोईवाडा पोलिस ठाण्यात या घटनेची तक्रार दिली. पोलिसांनी दोघांना आधी ताब्यात घेतले त्यानंतर एकाला पकडले. चौकशीत मिळालेल्या माहितीनुसार, हे तिघं ही संभाजीनगर येथून आले आहे.