Mumbaicha Raja Visarjan 2026: मुंबईच्या राजाचे यंदा प्रथमच बार्जवरून खोल समुद्रात विसर्जन; रात्री 8 ते 11 दरम्यान गिरगाव चौपाटीवर सोहळा
गणेशगल्लीतील मुंबईच्या राजाच्या २२ फूट उंच मूर्तीचे यंदा प्रथमच बार्ज जहाजावरून खोल समुद्रात विसर्जन होणार आहे. २५ सप्टेंबर २०२६ रोजी रात्री ८ ते ११ ही वेळ निश्चित करण्यात आली आहे. सकाळी ७ वाजता शेवटच्या महाआरतीनंतर मिरवणूक निघेल.
लालबाग सार्वजनिक उत्सव मंडळ, गणेशगल्लीच्या (Ganesh Galli) मुंबईच्या राजाचे (Mumbaicha Raja) विसर्जन यंदा प्रथमच बार्ज जहाजावरून खोल समुद्रात केले जाणार आहे. मंडळाचे हे 99 वे वर्ष आहे. गिरगाव चौपाटी (Girgaon Chowpatty) येथे शुक्रवारी 25 सप्टेंबर 2026 रोजी रात्री 8 ते 11 या वेळेत हा सोहळा होईल.
अनंत चतुर्दशीला, 25 सप्टेंबर रोजी सकाळी 7 वाजता शेवटची महाआरती होईल. त्यानंतर विसर्जन मिरवणुकीला सुरुवात होईल. ही मिरवणूक लालबाग ते गिरगाव चौपाटी या पारंपरिक मार्गाने जाईल. दरम्यान मुंबईच्या राजाच्या विसर्जन मिरवणूकीत सारी मुंबापूर नगरी रस्तावर दुतर्फा गर्दी करून भावपूर्ण वातावरणामध्ये बाप्पाला निरोप देते.
पहिल्यांदाच बार्जवरून विसर्जन
लालबाग सार्वजनिक उत्सव मंडळ, गणेशगल्ली मंडळाने यंदा 22 फुटी मूर्तीचे विसर्जन आधुनिक बार्ज जहाजावरून थेट खोल समुद्रात करण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबईच्या गणेशोत्सवात असा प्रयोग पहिल्यांदाच होत असल्याचे मंडळाने म्हटले आहे.
महाराष्ट्र सागरी मंडळ (मेरीटाईम बोर्ड), मुंबई पोलीस आणि बृहन्मुंबई महानगरपालिका यांच्या मान्यतेनुसार विसर्जनासाठी रात्री 8 ते 11 ही वेळ निश्चित करण्यात आली आहे. नक्की वाचा: Lalbaugcha Raja Visarjan Route: लालबाग ते गिरगाव चौपाटी दरम्यान लालबागचा राजा कोणत्या मार्गावरून जातो?
मूर्तीची उंची आणि परंपरा
मंडळाच्या माहितीनुसार, 1977 मध्ये देशात प्रथमच 22 फूट उंच गणेशमूर्तीची परंपरा त्यांनी सुरू केली. तेव्हापासून मंडळ उंच मूर्ती आणि देशातील विविध प्रसिद्ध मंदिरांच्या प्रतिकृतींचे भव्य देखावे यासाठी ओळखले जाते.
गणेशगल्लीचा गणपती 2004 पासून "मुंबईचा राजा" या नावाने ओळखला जातो. हा मुंबईतील सर्वांत जुन्या आणि मोठ्या गणेशोत्सवांपैकी एक आहे. लालबागचा राजा, चिंचपोकळीचा चिंतामणी आणि मुंबईचा राजा यांसारख्या मोठ्या मंडळांच्या मिरवणुकींना साधारणपणे 15 ते 20 तास लागतात. त्यामुळे मिरवणुकीच्या गतीनुसार चौपाटीवरील विसर्जनाच्या वेळेत बदल होऊ शकतो.
(The above story first appeared on LatestLY on Sep 24, 2026 12:29 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

