Mumbai News: अल्पवयीन मुलींचे फोटो मॉर्फ करणाऱ्या आणि फेक इंस्टाग्राम आयडीचा गैरवापर करणाऱ्या दोन आरोपींंना अटक, अर्नाळा येथील घटना

त्यांनी अल्पवयीन मुलींचे फोटो मॉर्फ केले त्यानंतर फेक इन्सटाग्राम आयडी तयार केले. आणि त्याचा गैर वापर केला. या घटनेमुळे विरार येथील अनार्ळा परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

arrest

Mumbai News: आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) अॅप वापरून अल्पवयीन मुलींचे फोटो मॉर्फ करून फेक इंस्टाग्राम आयडी तयार करून माध्यमातून तरुणींशी संवाद सादल्या प्रकरणी दोन तरुणांना अटक करण्यात आली आहे. विरारमधील अर्नाळा येथे ही घटना घडली आहे.अर्नाळा पोलिसांनी बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्याच्या कलम 354, 323, 504 आणि 506 अन्वये तसेच आयटी कायद्याच्या आधारे अश्लील गोष्टी प्रकाशित केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. दोन्ही आरोपींना वसई न्यायालयाने 28 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

जीत निझाई आणि यश निझाई अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे असून, ते अर्नाळा पोलीस स्टेशन हद्दीतील एका गावातील रहिवासी आहेत. जीत निझाई या आरोपींपैकी एकाने एआय अॅप वापरून त्याच्याच गावातील मुलींचे फोटो मॉर्फ केले होते. त्यानंतर त्याने हे फोटो इंस्टाग्रामवर अपलोड केले, तर दुसऱ्या मुलाच्या नावाने फेक इंस्टाग्राम अकाउंटही तयार केले. त्याच गावातील मुलींशी संवाद साधण्यासाठी या फेक अकाऊंटचा वापर केला जात होता. अशी माहिती पोलीसांनी दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन्ही आरोपींनी आर्टिफिशियल इंटेलिजन्स टूल्सचा वापर करून महिला आणि मुलींच्या फोटोंचा वापर करून आक्षेपार्ह व्हिडिओ तयार केला होता. दोन मुलींनी व्हिडिओ कॉल करून त्यांच्याशी जवळीक सादण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर दोन्ही आरोपींनी मुलींवर शारीरिक अत्याचार केले. पीडित मुलींनी अखेर पोलिसात जाऊन आरोपीविरुद्ध तक्रार दाखल केली. पोलिसांनी दोन्ही आरोपीला ताब्यात घेतले आहे. आणि त्यांच्याव गुन्हा दाखल करण्यात आला.